बुधवार, २० जानेवारी, २०२१

बरे वाटते

कविता केल्याने
मनाला थोडे बरे वाटते ।।
तुमची  लाईक आल्यावरती
लिहिलेले थोडे खरे वाटते।।

sandip s.  jagtap




तुझ्या दिसण्यावर

तुझ्या दिसण्यावर
रोज कविता करतो मी ।।
तुझ्या हसण्यावर 
रोज नव्याने मरतो मी।।
देण्यासाठी  भेट तुला 
तारे गोळा करत गगणात फिरतो मी।।

sandip jagtap

चुकीचा मार्ग

चुकीच्या मार्गाने चालण्यापेक्षा
माघारी फिरलेलंच बर।।
पावसात भिजण्यापेक्षा पाणी
जमिनीत मुरलेलच बर।।
पावसात भिजुन दगडाला
अंकुर फुटणार नाही।। 
क्षितीजामागे पळुन कधी
आभाळ भेटणार नाही।l

sandip jagtap






 



सोमवार, १८ जानेवारी, २०२१

प्रेम

मी तुझ्यावर प्रेम करतो 
मनापासून आणि आवडीने।।
तुही माझ्यावर प्रेम करावे
जमेल तसे  आणि सवडीने।।
नसेल जरी प्रेम तुझे
अडचण मला काही नाही।।
निवांत सांग होईल तेव्हा
मलाही लगेच घाई नाही।।

-------   संदीप जगताप -----@@


रविवार, १० जानेवारी, २०२१

कळत नकळत

मी कोणी कवी अथवा लेखक नाही
पण कधी कधी वेळच आशी येते
कळत नकळत एखादी कविता बनुन जाते।।

सकाळचे सहा वाजले की कॉलेजची घाई होते 
साडेदहाला लेक्चर पण ती थोडी लवकर येते 
दारामधून आत येताना तीची माझी नजरानजर होते 
कळत नकळत एखादी कविता बनून जाते।। 

पहिले लेक्चर सुरू होते
लक्ष मात्र सारखे तिच्या कडे जाते 
चुकून कधी तिही माझ्याकडे पाहते 
कळत नकळत एखादी कविता बनून जाते।।

दुसरे लेक्चर सुरू होते
माझ्या नावाबरोबर कोण तीचेही नाव घेते
रागवतो मित्रांवर पण मन मात्र खूश होते
कळत नकळत एखादी कविता बनुन जाते।।

शेवटच्या लेक्चरला मी थोडा नाराज होतो
तिला पाहण्यासाठीच आज कॉलेजला आलो होतो
माझ्याबरोबर न बोलतच जेव्हा ती निघून जाते
कळत नकळत एखादी कविता बनून जाते।।
 
रात्रीही मग तिच्या विचारातच झोप येते 
झाली असेल सकाळ म्हणून,
जेव्हा तासातासाला जाग येते 
कळत नकळत एखादी कविता बनून जाते।।

sandip jagtap