Thursday, November 7, 2019

लाज

लाज
होती नव्हती सोडुन सारी
कशाला हवाय साज
राखुन ठेवाव्या भावना थोड्या
थोडी राखून ठेवावी लाज

ऊत्साहाच्या भारात काही
होतील चुका आज
निघून जाईल तारूण्य एक दिवस
निघून जाईल साज

वास्तवाच्या लख्ख काळोखात
तेव्हा दिसणार नाही ताज
म्हणून
राखुन ठेवाव्या भावना थोड्या
थोडी राखून ठेवावी लाज

पानेच होत नाही झाडांची जेथे
वडाला कावळ्यांवरती नाज
सोडुन जातील सारे जे जे
सावलीला होते आज

उघडतील डोळे तेव्हा आर्त मारावी हाक
नात्यांच्या भिंतीला धडकुन
आपलाच येईल आवाज
म्हणून
राखुन ठेवाव्या भावना थोड्या
थोडी राखून ठेवावी लाज

Sandip s. Jagtap


my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com





आजचा दिवस खूप खास  गेला तु जवळ असल्याचा भास झाला  बरा होतो मी स्वप्नातच जगत भानावर आलो आणि त्रास झाला sandip s. jagtap my blog-   http://san...