शनिवार, १३ जून, २०२०

अजून हरलो नाही

अजून हरलो नाही


 जिंकलो नसेल जरी
 अजून हरलो नाही
 पाहुनी संकटे कधी
 मी माघारी फिरलो नाही

 तो पेलाच समजा मला
 जो अजून भरला नाही
 भरला असेल कित्येकदा
 पण कोणालाच पुरला नाही

भरलो जरी पाण्यानेच
 तरी पाण्यावर तरलो नाही
 जिंकलो नसेल जरी
अजून हरलो नाही

 नसेल  सूर्या परी मोठा मी
 तरी चमकणे सोडले नाही
 राहून गगणात कधी
 मी ताऱ्यांना तोडले नाही

काजव्या परीच मी
कधी गगनात फिरलो नाही
जिंकलो नसेल जरी
अजून हरलो नाही

 रोजची नवी ती पहाट
ज्याने अंधार दूर जावा
 पानांवरच्या या दवांनी
 धरती ला पूर यावा

 रोजच जातो मीटुनी
जरी उद्याला उरलो नाही
जिंकलो नसेल जरी
अजून हरलो नाही

पाहुनी संकटे कधी
माघारी फिरलो नाही
जिंकलो नसेल जरी
अजून हरलो नाही

  संदीप जगताप

  http://sandipsjagtap.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा