Thursday, July 9, 2026

प्रत्येकांसाठी पाऊस वेगळा वेगळा आसतो

कोणाला तो खिडकीतुन बघण्यासाठी आसतो

तर कोणाचा पाऊस हा जगण्यासाठी आसतो

कोणाला तो तळहातावर मोत्यांसारखा दिसतो

तर कोणाला धान्याच्या पोत्यांसारखा भासतो

प्रत्येकांसाठी पाऊस वेगळा वेगळा आसतो

कधी तो उंचावरील धबधब्यात आसतो

तर कधी  तो गरीबांच्या घरात घुसतो

Sandip s. Jagtap




Friday, July 3, 2026

पाऊस

तो एक पाऊस, आजही विसरता आला नाही 

थोडा घसराय हावा होता तोल तेव्हा, घसरता आला नाही

तिचे ओलेचिंब आंग मि मनात साठवत राहिलो

तिच्यासाठी मखमली चांदवा, पसरता आला नाही

चिंब भिजली होती ती डोळ्यांमध्ये माझ्या, 

पुन्हा कधी भेटणार, एवढा एक प्रश्न विचारता आला नाही 

तो एक पाऊस, आजही विसरता आला नाही 

sandip s. jagtap

my blog-  http://sandipsjagtap.blogspot.com





Tuesday, April 21, 2026

आजचा दिवस खूप खास  गेला

तु जवळ असल्याचा भास झाला 

बरा होतो मी स्वप्नातच जगत

भानावर आलो आणि त्रास झाला

sandip s. jagtap

my blog-  http://sandipsjagtap.blogspot.com

Monday, February 16, 2026

कविता माझी फक्त तुझ्यासाठी असावी

तिची प्रत्येक ओळ तुझ्या ओठी असावी 

सुटणार नाही आयुष्यभर कधीही 

आशी तुझी माझी एक मीठी आसावी






Sunday, February 8, 2026

GST कमी झाली की घ्यावी म्हणतो

तुलाही एकादी चाॅकलेट द्यावी म्हणतो

तुझ्या चेहऱ्यावरची ती निरागस स्माईल

बजेट जाहीर झाले की पाहावी म्हणतो 


जाॅब काय मला भेटेलच कधीतरी

पण तोपर्यंत तु माझीच राहावी म्हणतो

तुलाही एकादी चाॅकलेट द्यावी म्हणतो

GST कमी झाली की घ्यावी म्हणतो


Sandip s. Jagtap

Thursday, January 1, 2026

लेकीच लग्न, विचारानेच काळिज जळते

बाप काय असतो, बाप झाल्यावरच कळते


हात हातात घेऊन, पोर पहिले पाऊल टाकते

कौतुक भारी त्याला आपल्या लेकिचे वाटते

 

सार सुख त्याच्या पायावर लोळण जशे घालते

पहिला शब्द जेव्हा ती बाबा -बाबा बोलते


ईवलीश्या पावलांनी अंगणी ज्याच्या खेळते 

खर तर लेक खुप नशिबाने मिळते 


sandip s. jagtap

my blog-  http://sandipsjagtap.blogspot.com


















प्रत्येकांसाठी पाऊस वेगळा वेगळा आसतो कोणाला तो खिडकीतुन बघण्यासाठी आसतो तर कोणाचा पाऊस हा जगण्यासाठी आसतो कोणाला तो तळहातावर मोत्यांसारखा दि...