Thursday, July 9, 2026

प्रत्येकांसाठी पाऊस वेगळा वेगळा आसतो

कोणाला तो खिडकीतुन बघण्यासाठी आसतो

तर कोणाचा पाऊस हा जगण्यासाठी आसतो

कोणाला तो तळहातावर मोत्यांसारखा दिसतो

तर कोणाला धान्याच्या पोत्यांसारखा भासतो

प्रत्येकांसाठी पाऊस वेगळा वेगळा आसतो

कधी तो उंचावरील धबधब्यात आसतो

तर कधी  तो गरीबांच्या घरात घुसतो

Sandip s. Jagtap




Friday, July 3, 2026

पाऊस

तो एक पाऊस, आजही विसरता आला नाही 

थोडा घसराय हावा होता तोल तेव्हा, घसरता आला नाही

तिचे ओलेचिंब आंग मि मनात साठवत राहिलो

तिच्यासाठी मखमली चांदवा, पसरता आला नाही

चिंब भिजली होती ती डोळ्यांमध्ये माझ्या, 

पुन्हा कधी भेटणार, एवढा एक प्रश्न विचारता आला नाही 

तो एक पाऊस, आजही विसरता आला नाही 

sandip s. jagtap

my blog-  http://sandipsjagtap.blogspot.com





प्रत्येकांसाठी पाऊस वेगळा वेगळा आसतो कोणाला तो खिडकीतुन बघण्यासाठी आसतो तर कोणाचा पाऊस हा जगण्यासाठी आसतो कोणाला तो तळहातावर मोत्यांसारखा दि...