मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०२१

माझ्यासाठी पण कधी, लिहीत जा

तुझ्यासाठी नेहमीच, करतो कवीता मी

माझ्यासाठी पण कधी, लिहीत जा।। 

चंद्र, ताऱ्यांची उपमा नेहमीच देतो तुला 

अमावस्येच्या चंद्रात तरी, मला पाहत जा।। 

माझी होणार  नाही तु माहीत आहे मला

पण माझ्या कवितेची तरी होत जा।।

माझ्यासाठी  तुही कधी,  दोन शब्द लिहत जा।।


sandip s.  jagtap


सोमवार, ८ फेब्रुवारी, २०२१

तुझ्यासाठी

तुझ्यासाठी मी ही
एक कविता केली होती

समजू नये कोणाला म्हणून
फास्ट लिपीत लिहीली होती
चंद्र सूर्य ताऱ्यांची उपमा
मि ही तुला दिली होती

तुझ्यासाठी मी ही 
एक कविता केली होती 

एक दिवस असाच
तुला देण्यासाठी आलो 
पण मी येण्याअगोदरच
 तू निघून गेली होती

तुझ्यासाठी मी ही 
एक कविता केली होती 

पुन्हा एक दिवस थोडा पाऊस येत होता
मी कविता देण्यासाठी आलो पण 
मीच काय माझी कविताही तुला भेली होती 
तुला देण्या अगोदरच पावसाने भिजून गेली होती

 तुझ्यासाठी मी ही
 एक कविता केली होती


 ------ संदीप जगताप-------

मंगळवार, २ फेब्रुवारी, २०२१

हरीण

हरीण

बेधुंद धावते  
घेऊन पायामध्ये प्राण।।
काट्याकुट्यातून वाटं 
मागे भुकेलेले श्वान।।

थकल्या पावलांनी कसे 
तुडवती माळरान।।
 वेढले चहूबाजूंनी 
आता पायात नव्हते त्राण।।

थकलेल्या जीवाला मग
अपुरे पडले रान।।
 घेतला शेवटचा श्वास
 टाकली त्याने मान ।।

महागाईच्या दुनियेमध्ये
आज स्वस्त झाले प्राण ।।
पाहूनीया  हे सारे 
न हेलावले मन ।।

कारण हेच आहे जग 
हेच आहे जीवन।।
sandip s. jagtap


my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com