गुरुवार, ८ डिसेंबर, २०२२

नको लागु नादाला तिच्या

नको लागु नादाला तिच्या

नको लागु नादाला तिच्या
तुझ्या आधी ही खुप आहे।।
आवडतो जो चेहरा तुला
दाखवायचे रुप आहे।।

तुझ्या आधी मि ही होतो
रांगेमधे फुल घेऊन ।।
रोजचीच ति निराशा
जायचो मग फुल पेऊन।।

तिच्या ओठांवरची लालि कधी 
माझ्या ओठांवरही आली होती।।
तुला देते स्माईल जी
मिच तिला दिली होती।।

कदाचित तुझी होईलही ति
कधी माझी ही झाली होती ।।
दिली आसेल शप्पथ  जन्म मरणाची
ती पण मिच तिला दिली होती।।

देईल सोडुन तुला 
एक दिवस वाऱ्यावरती।।
लिहशिल तु ही कविता
एक दिवस माझ्यासारखी।।

पाहुन हासेल तुला
हासवणारे हि खुप आहे।।
आवडतो जो चेहरा तुला
दाखवायचे रुप आहे।।

नको लागु नादाला तिच्या
तुझ्या आधी ही खुप आहे।।

sandip jagtap






शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२

पहिला घोट घेता घेता

पहिला घोट घेता घेता

दाता खाली खडा लागला
चणे फुटाणे खाता खाता !!
पहिल्या प्रेमाची आठवण झाली
पहिला घोट घेता घेता !!

जेव्हा ती पहिल्यांदा दिसली !!
माझ्याकडे पाहुन गालात हासली !!

हे ही मला मित्रांनीच सांगितलले
माझ्याच पैशांची पिता पिता   !!
पहिल्या प्रेमाची आठवण झाली
पहिला घोट घेता घेता !!

नजरेचेच बाण मग
काळजाला भिडु लागले !!
पाहण्यासाठी तिची एक आदा
डोळे आपापसात लढु लागले !!

बाणा मागे बाण सुटले 
प्रेम आमचे होता होता !!
पहिल्या प्रेमाची आठवण झाली
पहिला घोट घेता घेता !!

बागेमधल्या पहिल्याच भेटीत
घेतले तिला मी आसे मिठीत !!
झिरझिरणारया पावसाचे थेंब 
मग दोघांमध्ये बसलो वाठीत !!

पाऊसही मग थकुन गेला
वाठणी आमची होता होता !!
पहिल्या प्रेमाची आठवण झाली
पहिला घोट घेता घेता !!

प्रेमामध्ये भांडणाचे
 खटके थोडे ऊडु लागले !!
पाण्यामध्ये आलकोहोलचे
प्रमाण थोडे वाढु लागले !!

बाटल्या मागुन बाटल्या संपल्या 
ब्रेक अप आमुचा होता होता !!
पहिल्या प्रेमाची आठवण झाली
पहिला घोट घेता घेता !!


sandip jagtap



मंगळवार, ७ जून, २०२२

ss

सगळ्याच कविता आनुभवातुन लिहायच्या नसतात काही कल्पनेतून ही लिहाव्या लागतात

सगळ्याच कविता आनुभवातुन लिहायच्या म्हटलं तर


रोज कोणासाठी तरी
झुरावे लागले आसते
रोज कोणासाठी तरी
मरावे लागले आसते

कंटाळले आसते लोक
रोज जाळायला ही
स्वतःच स्वतःला
पूरावे लागले आसते

Sandip jagtap

my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com

बुधवार, २५ मे, २०२२

तुच सांग

तुच सांग मला
माझे प्रेम खोटे होते
कि तूझे प्रेम खोटे होते
मिच घेतले मिठीत जरी
हात तुझे कोठे होते
तुच सांग मला

तुझा नी माझा एक झाला 
तो श्वास खोटा होता
का तुझ्या ओठांना झाला
 तो त्रास खोटा होता
मी आहेच बेईमान पण
तुझे ईमान कोठे होते

तुच सांग मला
माझे प्रेम खोटे होते
कि तूझे प्रेम होते


तु उशाला घेतला तो चंद्र खोटा होता
की तुझ्यासाठी आंथरले ते तारे खोटे होते




सोमवार, १६ मे, २०२२

ह्रदय

नको डोकावू ह्रदयात माझ्या
ह्रदय माझे खोल आहे
जाइल कधीही तोल तुझा
हे अनुभवाचे बोल आहे

बुधवार, ११ मे, २०२२

तु विसरुन जा

दिसणार नाही आता
मी स्वप्नातही तुला।।
मी विसरून जातो तुला
तु ही विसरून जा मला।।

लग्न जमलेला जेव्हा
मेसेज तुझा आला।।
मेसेज बरोबर मी 
तूझा नंबरही डिलेट केला।।

दिसणार नाही आता
मी स्वप्नातही तुला।।
मी विसरून जातो तुला
तु ही विसरून जा मला।।

नको खाऊ तू मनाला
तूझी चुक नाही काही।।
प्रेमात पडण्याची
मीच केली होती घाई।।

नको हिशोब प्रेमाचा
आता परवडणार नाही मला।।
मी विसरून जातो तुला
तु ही विसरून जा मला।।

विसरून जा त्या भेटी
विसरून जा ती मिठी।।
विसरून जा ते शब्द
होते तुझ्या त्या ओठी।।

विसरून जा तो श्वास
जो दोघांचा एक झाला।।
मी विसरून जातो तुला
तु ही विसरून जा मला।।

sandip s. jagtap


my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com