रविवार, २४ नोव्हेंबर, २०२४

होती सोबत तुझीच आजवर 
जरी होत्या दोघांच्या वाटा वेगळ्या 
माहीत होते हातात राहणार नाही
तरी वेचल्या मी त्या लाटा सगळ्या 

कहाणी होती खरी वेगळीच काही 
तरी रचल्या साऱ्या कथा वेगळ्या
पाण्यावरतीच तरल्या डोही
जरी बुडवल्या गाथा सगळ्या 


सोमवार, १८ नोव्हेंबर, २०२४

दुरवर काळोख सारा, वाराही शांत आहे 

तिच्या शिवाय आज, खरच मी  जिवंत आहे ?


बुधवार, १६ ऑक्टोबर, २०२४

खुप दिवसांनी आज तीचा

मेसेज आला कसा आहे...

आग वेडे बदलली तर तू

मी जसा होतो तसा आहे...

 Sandip S. Jagtap

मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०२४

पांघरले आभाळ प्रेमाचे जरी

पाय माञ शेवटी उघडेच होते 

तिच्या साठी जोडले हात जेथेही

ते सारे रंगलेले दगडेच होते


पाहीली वाट आयुष्यभर तीची

मेलो तरी डोळे ऊघडेच होते

तीही रडालीच मेल्यावर मी

रडणारे आता सगळेच होते

 

Sandip s. jagtap

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०२४

करणार होतो कॉल तुला पण

तु पहिल्या सारखी राहीली नाही

कालच काढली होती आठवण

ती अजुनही तु पाहिली नाही


Sandip s. jagtap






  ,  

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०२४

जर आलीच आठवण कधी
तर नीरोप दे त्या वाऱ्याकडे
मी पाहतच आसेल तिकडे
तुही पाहा त्याच ताऱ्याकडे

sandip s. jagtap

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०२४

स्वप्नच होत ते

स्वप्नच होत ते,

स्वप्नच होत ते, मला खरे वाटत होते,
पण वास्तवा पेक्षा तेच बरे वाटत होते

भांडण्यातही होत प्रेमच तीच्या
आन मला ते वादळ वारे वाटत होते

काजव्यांचा घोंगाट होता भोवताली
काळोखात मला ते तारे वाटत होते

खरा गोडवा तीच्या  बोलण्यात होता
 मला ते नेहमीच  खारे वाटत होते

स्वप्नच होत ते, मला खरे वाटत होते,
पण वास्तवा पेक्षा तेच बरे वाटत होते

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०२४

फक्त रड म्हणा

फक्त रड म्हणा


(फक्त लढ म्हणा या कवी कुसुमाग्रज यांच्या कवीतेचे वीडंबन)

ओळखलत का डाॅक्टर
दवखाण्यात आला कोणी,
कपडे होते  फाटलेले 
डोळ्यांमध्ये  पाणी ॥

क्षणभर  हसला गपकण बसला
बोलला दम खाऊन ,
लव लेटर द्यायला  गेलो 
तीने दिल्या  दोन  ठेवून॥ 

दोन  मिनिटात  तेथे
भाव तीचा पोहचला,
चपल्या टाकून  पळालो
जिव कसाबसा  वाचला ॥

हात मोडला , पाय मोडला 
कंबरटेच पार मोडले,
प्रसाद  म्हणून  घरी  येऊन 
बापानी तीच्या  झोडले॥ 

इंजेक्शन  कडे  हात जाताच
कसाबसा  उठला ,
इंजक्शन नको डाॅक्टर 
फक्त मुक्का मार बसला ॥

राहीलेले लव लेटर 
आता  लीहीत आहे,
मुक्का मार त्याची
आठवण देत  आहे॥

खाल्ला  एवढा  मार तरी 
मोडला नाही  कणा, 
पाठीवरती हात ठेवून
फक्त रड म्हणा॥

sandip jagtap

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०२४

चार आणे

चार आणे

खुप दिवसानंतर काल 
भेटले होते चार आणे
किंमतच राहीली नाही
सांगु लागले गाऱ्हाणे

दोन हाजाराची नोट मग
बोलली तोऱ्या तोऱ्याने
आम्हालाही याव लागत होत
नेहमी मागच्या दाराणे

हाजार पाचशेही बंद झाले
नोट बंदिच्या काहाराणे
शंभर दोनशे थकुन गेले
आर्थकारणाच्या भाराणे

कोण मोठा कोण लहान
सगळ्यांचेच आहेत हाल
चार आण्याला भेटल्यावर
सारे लक्षात आले काल

sandip s. jagtap

my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com

सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४

ओझे

ओझे
दगडाचे गाठोडे डोक्यावरती घेऊन
त्या उंच डोंगरावरती जात आहे।।
पण प्रश्न कधीच का पडत नाही
हे ओझे मी का वाहत आहे।।

काट्याकुट्यातून वाट काढत
प्रवास अखंड करतो आहे।।
भेटतील जे ही दगड वाटेत 
गाठोड्यात भरतो आहे।।

डोक्यावरचे ओझे कधी
खांद्यावरती घेत आहे।। 
खांद्यावरचे ओझे पुन्हा
डोक्यावरतीच जात आहे।।

पण प्रश्न कधीच का पडत नाही
हे ओझे मी का वाहत आहे।।

मदतीला भेटेल कोणी 
वाट त्याची पाहत आहे।।
भेटला जो ही वाटेवरती
स्वतःचेच ओझे  वाहत आहे।।

थांबलो जरी विसाव्याला
गाठोडे उशाला घेत आहे।। 
रात्रंदिवस त्याला
उभा पहारा देत आहे।।

पण प्रश्न कधीच का पडत नाही
हे ओझे मी का वाहत आहे।।

निम्म्या प्रवासानंतर मग 
गाठोड्याचे  ओझे वाटू लागते।।
जसा प्रवास पुढे जाईल
गाठोडेही फाटु लागते।।

घेऊन जावे का ठेऊन जावे
प्रश्न पुढे येत आहे।।
घेऊन कोणीच जात नाही
येथे दगडच शिल्लक राहत आहे।।

त्या दगडांचे मग पुन्हा
उंच डोंगर होत आहे।।
पण प्रश्न कधीच का पडत नाही
हे ओझे मी का वाहत आहे।।

sandip s. jagtap


my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com

मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४

नको कांगावा पाणी ओतायचा
झोपडी केव्हाची पेटुन गेली
आता लावतेस मलम कशाला
जखम काळजाला आतुन झाली

करू नकोस आरोप कोणावर
चुक तर माझ्याच हातून झाली
मी विश्वास ठेवला त्या पहाटेवर
जी आंधाराला रात्रीच भेटुन गेली

..... sandip s. jagtap



सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४

गेली आहेस तु, जेव्हा रूसून माझ्यावर
गझलही रुसली, तेव्हा पासुन माझ्यावर

sandip s. jagtap

सोमवार, १६ सप्टेंबर, २०२४


तीला वाटले, आज कविता केली नाही
म्हणजे तीची आठवणच आली नाही
कसे सांगु तुला आजुन तु
डोळ्यासमोरूनच गेली नाही

शनिवार, १४ सप्टेंबर, २०२४

कविता माझ्या तिला खोट्या वाटतात
कविता माझ्या तिला छोट्या वाटतात
म्हणून पाहिला संग्रह जुनाच ऊचकुन
कविता मला माझ्या एकट्या वाटतात

...... sandip s. jagtap

शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०२४

नको तुझा होकार आता

नको तुझा होकार आता

नको तुझा मला नकार आता
नको तुझा मला होकार आता
झाले गेले सारे विसरून जा
नको चर्चा सारी मोकार आता

होती गरज कधी माझीही तुला
झालो आहे बघ बेकार आता
साथ सोडली वेळेनेही जेव्हा
शिकारीच झाला शिकार आता

...... sandip s. jagtap

रविवार, १८ ऑगस्ट, २०२४

जर तुला जमल तर

 जर तुला जमल तर

बघ करून एवढच फक्त , जर तुला जमल तर
दे घोटभर पाणी, कोण चालुन चालून दमल तर

हासत आहे जसा तु, तसा दुसऱ्यांना ही हासवत राहा
काय माहीत हासता हासताच जर आयुष्य थांबल तर

बघ करून एवढच फक्त , जर तुला जमल तर

उंच उंच बिल्डींग आणी खोट्या  खोट्या चेहऱ्यांतुन
गावाकडेही जाऊन बघ, माणसात मन रमल तर

घे भरारी ऊंच आकाशात, जिंकुन घे हे सारे जग
पाय मात्र जमीनीवरच ठेव, बघ तुला जमल तर

...... sandip s. jagtap

शनिवार, १० ऑगस्ट, २०२४

ती सोडुन गेल्याचे, नका विचारू मला आता

ती सोडुन गेल्याचे, नका विचारू मला आता

ती सोडुन गेल्याचे, नका विचारू मला आता
खुप कष्टाने आज, विसरलो मी तीला आता

माझ्यापाशी तीचे आता काहीच ऊरले नाही
शब्दही खोटाच निघाला, जो तीने दिला होता

तिच्या पाशीही आसेल काही, आसे वाटत नाही 
आसा कोणता व्यवहार आमच्यात झाला होता

खापर चर्चानचे तीने फोडले, माझ्यावरच सारे
खरा बोभाट तर, तीच्या मैत्रीणीनेच केला होता

ती सोडुन गेल्याचे, नका विचारू मला आता
खुप कष्टाने आज, विसरलो मी तीला आता

...... sandip s. jagtap

गुरुवार, २५ जुलै, २०२४

खुप दिवसांनी आज कविता लिहायला घेतली
कारण तेच होते, आज ती पुन्हा एकदा भेटली
 
बोलायचे होते खुप काही, ते आजही राहुन गेले
राहीले होते तेव्हाही, जेव्हा ती पहील्यांदा भेटली

---  Sandip s. Jagtap
my blog-
http://sandipsjagtap.blogspot.com






सोमवार, २४ जून, २०२४

मला नेहमी आसे का टाळतेस

मला नेहमी आसे का टाळतेस

मला नेहमी आसे का टाळतेस
काळीज माझ का जाळतेस

नसेल प्रेम तुझे सांगुन टाकावे
उगच माझ्यावर का भाळतेस

माहीत आहे तुला आवडतो मोगरा
डोक्यात चाफा मग का माळतेस

मला नेहमी आसे का टाळतेस
काळीज माझ का जाळतेस

ह्रदयात तुझा मिच आहे आजही
मोकार पसारा मग का चाळतेस

आहेत जर आपल्या वाटाच वेगळ्या
आभाळाला क्षीतीजावर का मिळतेस

मला नेहमी आसे का टाळतेस
काळीज माझ का जाळतेस

sandip s. jagtap

बुधवार, १९ जून, २०२४

कळिणेही फुलुन घ्यावे, गळुन जाण्याआधी
रोपानेही बहरुन घ्यावे, जळुन जाण्याआधी

समुद्राला मिळाल्यावरती आस्तीत्व तरी काय तीचे
नदिनेही खळखळुन घ्यावे मिळुन जाण्याआधी







शुक्रवार, ३१ मे, २०२४

बिना नावाची नाती

बिना नावाचीच बघ
आसतात  काही नाती
ज्याच्या साठी आजवर
किती जागल्या मी राती

नाही काहीच जवळ
तरी हारवण्याची भीती
सांग फुलाचा सुगंध
त्याला जपावा तरी किती

सांग आभाळाला तुझ्या 
मला बरी आहे माती
होते ढगांचेही पाणी
फक्त तीच्या भेटी साठी

बिना नावाचीच बघ
आसतात काही नाती

sandip s. jagtap

शुक्रवार, २४ मे, २०२४

राखण करतो ज्याची
ते गबाळ माझे नाही
अन जेथे चंद्र माझा
ते आभाळ माझे नाही

sandip s. jagtap

मंगळवार, ७ मे, २०२४

आज शब्दही धोका देऊन गेले


आज शब्दही धोका देऊन गेले

माणसानचे ठीक आहे हो,
आज शब्दही धोका देऊन गेले
तुटके शेर माझ्या साठी आन
मतला माझा घेऊन गेले

वाटले होते गझल माझी
पुर्ण होईन तुझ्या साथीने
जरी दुख: गेले ठेऊन मला
रदीफ, काफिया घेऊन गेले

माणसानचे ठीक आहे हो,
आज शब्दही धोका देऊन गेले

---  Sandip s. Jagtap
my blog-
http://sandipsjagtap.blogspot.com


शनिवार, ४ मे, २०२४

जाता जाता

जाता जाता तुला आज
मनभरुन पाहुन घेतो
तुझ्या शिवाय राहण्याची
सवय मनाला लावुन घेतो

तुझ्या बरोबर कँफी पिण्याचे
स्वप्न स्वप्नच राहुन देतो
तू तूझी कँफी पिऊन घे
मिही माझी पिऊन घेतो 

जाता जाता तुला आज
मनभरुन पाहुन घेतो

---  Sandip s. Jagtap
my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com




शुक्रवार, ३ मे, २०२४

परक्यानपासुन थोडे दुरूनच राहावे
स्वत:  पुरते थोडे ऊरुनच राहावे

कापुर होण्यापेक्षा ऊदबत्तीच बरे
राखेपुरते तरी पुरूनच राहावे

---  Sandip s. Jagtap
my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com

बुधवार, १ मे, २०२४

मला न सांगताच

मला न सांगताच

मला न सांगताच तु,
जेव्हा निघुन जाते बघ
भकास होते सारी दुनीया,
भकास सारे होते जग

विसरुन जाते जरी मन,
आठवण येते तरी पण
खोटे खोटे हासता हासता
डोळ्यात पाणी येते बघ

मला न सांगताच तु,
जेव्हा निघुन जाते बघ

---  Sandip s. Jagtap
my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com

बुधवार, २४ एप्रिल, २०२४

आसे थोडे सखे तुझे गाल आहे

आसे थोडे सखे तुझे गाल आहे

रात्रभर जागावे विचारात तुझ्या
आसे थोडे आज माझे हाल आहे
लिहावी गझल रोज तुझ्यावरी
आसे थोडे सखे तुझे गाल आहे

तुझ्या नकट्या नाकावर 
 रोज लिहावे किती मी
हारणी सारखी थोडी
 तुझी चाल आहे

तुझ्या टपोरा  डोळ्यांवर 
कराव्या कविता हाजारो
आसे  कोठे  डोळे  
तुझे नशिले आहे

भरावे पोट पाहुन तुला
आसे ओठ थोडे तुझे लाल आहे
 फुल  चाफ्याचे डोक्यात माळावे तुझ्या
आसे थोडे सखे तुझे बाल आहे

---  Sandip s. Jagtap
my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com






तुझा होकार बास आहे

तुझा होकार बास आहे

कोण म्हणते जगण्यासाठी
आती आवश्यक श्वास आहे
जगण्यासाठी मला फक्त
तुझा होकार बास आहे

केलास तु , जो इशारा
काल जाता - जाता
हा तुझा होकार समजु
का माझा भास आहे 

कोण म्हणते जगण्यासाठी
आती आवश्यक श्वास आहे

नको टाळुस तु मला 
नजरे समोर आशी
तुझा शिवाय फुलालाही
पाकळ्यांचा त्रास आहे

कोण म्हणते जगण्यासाठी
आती आवश्यक श्वास आहे
जगण्यासाठी मला फक्त
तुझा होकार बास आहे

---  Sandip s. Jagtap
my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com




मंगळवार, १६ एप्रिल, २०२४

रेती

रेती

शोधत होतो या किनारी,
ती गावाकडची माती
कळलेच नाही कधी नीसटली
पायाखालची रेती 

रोज  नवीन लाठा येथे,
रोज नवीनच भेटी
लाठांमध्ये शोधत राहीलो
मी विश्वासाची नाती

---  Sandip s. Jagtap
my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com





रविवार, १४ एप्रिल, २०२४

काय सांगु तुझाविना
माझे काय हाल होते
तुझे जे आज आहेत
माझे ते काल होते

गरीबी फक्त मलाच येथे
बाकी सारे मालामाल होते
काय सांगु तुझाविना
माझे काय हाल होते

---  Sandip s. Jagtap
my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com

बुधवार, ३ एप्रिल, २०२४

मोकळे आभाळ बरे

मोकळे आभाळ बरे

नको सुर्य, नको चंद्र, 
नको लूकलुकणारे तारे
एकटा  जिव त्याला
मोकळे आभाळ बरे

 आन काय करणार त्या 
 वसंत ऋतुचे आता
मोकळेच माळराण आन
बरे आहे वादळ वारे

---  Sandip s. Jagtap

my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com

शनिवार, २३ मार्च, २०२४

कोणीच नाही ती माझी
तरीही माझी वाटते
प्रेम वगेरे काहीच नाही
फक्त काळजी वाटते

---  Sandip s. Jagtap

my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com

गुरुवार, २१ मार्च, २०२४

तुला पाहण्याचा आसा आजार झाला

तुला पाहण्याचा आसा आजार झाला

तुला पाहण्याचा, आसा आजार झाला
भेटी साठी जिव, जसा बेजार झाला

माझ्याकडे जेव्हा, पाहीला फोटो तुझा
तेव्हा पासुन दुश्मन, सारा शेजार झाला
तुला पाहण्याचा, आसा आजार झाला

तुला विसरण्याचे, केले उपाय किती 
भावनानचा येथे, सारा बाजार झाला
तुला पाहण्याचा, आसा आजार झाला

तुला पाहुनच आता, भरते पोट माझे
हा मोकारच कशाला, पाहुनचार केला
तुला पाहण्याचा, आसा आजार झाला

पाहतो सारखाच, तु तक्रार केली माझी
अन डोळा माझाच तूला, साक्षीदार झाला
तुला पाहण्याचा, आसा आजार झाला

तु एकट्याला सोडुन, गेलीस दुर जरी 
तुझ्या आठवणीने, मला आधार दिला

तुला पाहण्याचा, आसा आजार झाला
भेटी साठी जिव, जसा बेजार झाला

sandip s. jagtap
my blog:

शुक्रवार, १५ मार्च, २०२४

आसे वाटते कधी कधी

आसे वाटते कधी कधी

तिही पाहते चोरुन मला, 
आसे वाटते कधी कधी
नजरेत ठेवते धरुन मला, 
आसे वाटते कधी कधी

तोल सावरने तीलाही आहे
पहिल्या पेक्षा कठीण आता
पण तोल तीने का सावरावा
आसे वाटते कधी कधी

सोमवार, ११ मार्च, २०२४

वाटले कि लिहतो, मनाला पटले कि लिहतो
मनासारखे मन मनाला भेटले कि लिहतो



शुक्रवार, ८ मार्च, २०२४

बाई

बाई

एका जन्मी किती रुपे
बघा बदलते बाई
काल बापाची लाडकी 
आज कामाची तीला घाई

कधी गरीब गाई 
कधी आनाथांची माई
हारलेल्या भावासाठी 
आहे आधाराला ताई

एका जन्मी किती रुपे
बघा बदलते बाई

आपल्या लेकरा साठी
जरी हाळवी ती आई
गाडा मोडक्या संसाराचा 
हासत ढकलते बाई

एका जन्मी किती रुपे
बघा बदलते बाई

एका जन्मात ऊपकार
तीचे फिटणार नाही
तीच वीठ्ठल माझी
तीच माझी रूखमाई

एका जन्मात किती
रुपे बघा बदलते बाई




गुरुवार, ७ मार्च, २०२४

फक्त एक भेट मागतो

फक्त एक भेट मागतो

मि कधी ओठांवरती,
सखे तुझे ओठ मागतो
आठवणीत राहील आशी,
फक्त एक भेट मागतो
 
मी आणि तु  दोघेच
आसेल निवांत जेथे
विरहा नंतर भेटायला
आसे एक बेट मागतो

मि कधी ओठांवरती
सखे तुझे ओठ मागतो

बिज प्रेमाचे रूजेल जेथे, 
अश्रुंच्या ओलाव्यावरती
आसे उजाड माळरान
किंवा पडिक शेत मागतो

मि कधी ओठांवरती
सखे तुझे ओठ मागतो

तुझ्या प्रेमा पेक्षाही येथे 
आहे कोणती नशा गहरी
आठवणीत जगण्यासाठी
फक्त दोन घोट मागतो

मि कधी ओठांवरती,
सखे तुझे ओठ मागतो
आठवणीत राहील आशी,
फक्त एक भेट मागतो



बुधवार, २८ फेब्रुवारी, २०२४

पाठीवर केले, आज वार तीने

पाठीवर केले, आज वार तीने

ह्रदयात छेडली होती, तार जिने
पाठीवर केले, आज वार तीने

शस्त्रात कोणत्या ताकत होती
मग शब्दांनाच लावली धार तीने 

जखमाही मला समजल्या नाहीत
आसे घाव केले हळुवार तीने

जी फुले दिली मी, प्रेमाने तीला
माझ्यासाठी केले त्याचे हार तीने

दुःख ही मला हवेहवेसे वाटते
प्रेमात केले आसे बेजार तीने

गेलो घेऊन फुल गुलाबाचे तीला
हातात ठेवली होती तलवार तीने

ह्रदयात छेडली होती, तार जिने
पाठीवर केले, आज वार तीने





गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०२४

तीही बहुतेक माझ्या प्रेमात पडत आहे

तीही  बहुतेक माझ्या प्रेमात पडत आहे

वाटले होते आगदी तसेच घडत आहे
तीही  बहुतेक माझ्या प्रेमात पडत आहे

बोलणे माझ्याशी तिचे बिल्कुल होत नाही
एकांतात ती आता एकटी बडबडत आहे
तीही  बहुतेक माझ्या प्रेमात पडत आहे

चेहऱ्यावर आहे तिच्या वेगळी चमक आता
गालावर आता तिच्या खळी पडत आहे
तीही  बहुतेक माझ्या प्रेमात पडत आहे

पाहून आरशात एकटीच हासते ती
आठवणीत माझ्या एकटी रडत आहे
तीही  बहुतेक माझ्या प्रेमात पडत आहे

तिलाही भेटीची माझ्या ओढ आशी लागली
सागराला लाटा जशा किणाऱ्याशी ओढत आहे
तीही  बहुतेक माझ्या प्रेमात पडत आहे


शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

आसे काही नाही

आसे काही नाही

मिळाली सहज तर ठेवतो जवळ
भेटलीच पाहीजे आसे काही नाही

पाजली कोणी तर पितो बळच
घेतलीच पाहीजे आसे काही नाही

आहे तेवढ्यात मी आहे समाधानी 
बाटलीच पाहीजे आसे काही नाही

लागेल तशी मी हातानेच घेईल
ओतलीच पाहीजे आसे काही नाही

शेंगदाने फुटानेही चालतील मला
चकलीच पाहीजे आसे काही नाही

जास्तीची झाली तरीही सहन करतो
ओकलीच पाहीजे आसे काही नाही

गाडीही माझी आसते बेताची
ठोकलीच पाहीजे आसे काही नाही

न घाबरताही मी घरामध्ये जातो
ती झोपलीच पाहीजे आसे काही नाही

न बोलताच काही गप झोपुनही घेतो
ती भांडलीच पाहीजे आसे काही नाही

sandip s. jagtap
 my

गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०२४

माझे जगणे

माझे जगणे

माझे जगणे मी,
तुझे आयुष्यात येण्यात पाहिले
आन तुझे सुख तू,
माझ्या निघून जाण्यात पाहिले

 शब्द जरी तुझे,
 काळीज चिरुन जात होते
 प्रत्येक शब्द तुझे,
 मी माझ्या गाण्यात पाहिले

तुझ्या टपोऱ्या डोळ्यांमध्ये
असा मी हरवून गेलो
तुझ्या खोट्या सौंदर्यापुढे
चंद्र सूर्य पाण्यात पाहिले

जरी हातात तुझ्या,
मी खंजिर देखले होते
तरी जगणे मी,
तुला मिठीत घेण्यात पाहिले

sandip s. jagtap
 my

मंगळवार, २६ डिसेंबर, २०२३

दुरावा

दुरावा

झाला तो झाला, आता नको दुरावा
माझ्या ह्या प्रेमाचा मागु नको पूरावा

होकार तुझा मी घेईन समजुन
डोळांनी फक्त तु इशारा करावा













सोमवार, २७ नोव्हेंबर, २०२३

गारपीठ

गारपीठ

चुकलच देवा भरोसा तुझाव ठेवला
तुझा जिवाव संसार सारा पणाला लावला

सार ऊसन करून पिक जोमत आणल
लेकरा परीस जिव पिकाला लावला
 
आजची गारपीठ सार घेऊनच गेली
पाठीचा कणा वाकल्या सपराला लावला 

अवंदा कांद्याच्या पैशाव तुला घेईल सदरा
खोट्याच आशेव यंदाही लेकाला ठेवला

पुढच्या वर्षी व्यजासहीत करीन परत  
थकला बापही आज सालाने ठेवला

सार घरदार बघ आज ऊपाशी झोपल
ज्याच्या जिवावर सारा जमाना जेवला

आश्रुच पिऊन बाप आज ऊपाशी झोपला
भाबड्या आईने तुला नौवद गोडवा ठेवला

पहाणी कराया सरकार बांधावर आले
फोटो काढुन त्यांनी निवडणुकीला ठेवला

चुकलच देवा भरोसा तुझाव ठेवला
तुझा जिवाव संसार सारा पणाला लावला



....
sandip s. jagtap

my blog:


शुक्रवार, २४ नोव्हेंबर, २०२३

एकटाच होतो

एकटाच होतो

काय भेटते रोज आसे छळुन मला ?
का जातेस रोज आसे टाळुन मला ?

आसेही तुझ्याविना काय जिंदगी,
टाक नकाराने एकदाचे जाळुन मला

धोकाच राहील शिल्लक या आयुष्यामध्ये 
काय उपयोग हिशोब सारा चाळुन मला

खुप पोळलो आहे तुझा ह्या प्रेमामध्ये
काय चटके बसणार विस्तवाशी खेळुन मला

फुटेल आंकुर प्रेमाचाच पुन्हा एकदा
जरी टाकले खोल तु गाडुन मला

ऊगवेल किरण आशेचा नव्याने ऊद्या
आज टाकले आंधाराने गिळुन मला

मी आहे न उमजणारी प्रेम पुस्तीका
न वाचताच टाकले तु फाडुन मला

तुझा बरोबर राहुन ही एकटाच होतो
काय फरक जरी गेलीस सोडुन मला

....
sandip s. jagtap

my blog:

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०२३

भाव थोडासा खाशील का ?

भाव थोडासा खाशील का? 

गर्लफ्रेंड जरी झाली नाही, 
भाव थोडासा खाशील का ?
मन राखण्यासाठी तरी , 
लाईन थोडीशी देशील का ?

काँफी प्यायला येणार नाही तु
हे ही मला माहीत आहे,
कँन्टीन मधला चहा तरी तु
माझ्यासोबत पेशील का ?

आयुष्यभर पाहील वाट मी
जरी तु भेटणार नाही,
पाहाटेच्या स्वप्नात तरी तु
थोडा वेळ येशील का ?

प्रेमाच्या सागरात या
तु कधिही पडणार नाही,
प्रेमात बुडताना मला
आधार थोडा देशील का ?

दाढी केस वाढवुन जरी
प्रेमात वेडा झालो  मी,
या वेड्याला प्रेमाने  तु 
ओळख तरी देशील का ?

गर्लफ्रेंड जरी झाली नाही, 
भाव थोडासा खाशील का ?
मन राखण्यासाठी तरी, 
लाईन थोडीशी देशील का ?
....
sandip jagtap

my blog:






शनिवार, २८ ऑक्टोबर, २०२३

बघ तुला जमतय का

 बघ तुला जमतय का

करत आहे जी चुक मी
तुही एकदा करुन बघ ।।
रखरखता विस्तव एकदा
तळहातावर धरून बघ ।।

उगवणार नाही माहीत आहे
तरी या उजाड माळावर,
बिज प्रेमाचे पेरायला
बघ तुला जमतय का ।।

वारा येईल निरोप घेऊन
त्याला थोडा वेळ थांबव ।।
बोलणार नाही काहीच तो
तरी संभाषण थोड लांबव ।।

माझ्या मनातल सांगीतलय सगळ,
तुझ्या मनातलही सांगायला
बघ तुला जमतय का ।।

मि न लिहीलेले कोरे पत्र वाच
बघ काय समजतय का ??
मी न बोलताच ऐकण्याचा प्रयत्न कर 
बघ काय उमजतय का ??

उमजणार नाही काहीच तुला,
तरी समजण्याचा प्रयत्न कर
बघ तुला जमतय का ।।

आभाळातल्या ताऱ्यांनला
थोडावेळ जमिनीवर बोलव ।।
तुझ्याबरोबर त्यानां ही
दोन पावल चालव ।।
 
आता बघ त्या एकट्या चंद्राकडे, 
त्या चंद्राला समजुन घ्यायला
बघ तुला जमतय का ।।

आता आभाळ ढगांनी
दाटुन येईल ।।
सहनशिलतेच छप्पर
फाटुन जाईल ।।

आता कधीही कोसळेल सर 
ति सर आऋंची थांबवायला
बघ तुला जमतय का ।।

़़़़़sandip s. jagtap
my blog:

गुरुवार, २६ ऑक्टोबर, २०२३

मला नवे नाही

मला नवे नाही

 तुझे आयुष्यात येणे, तुझे दूर जाणे
 तु माझी असणे, तु माझी नसणे
 हे सारे आता, मला नवे नाही।।

तुझ्यासाठी जगणे, तुझ्यासाठी मरणे, 
तुझ्यामागे फिरणे, तुझ्यासाठी झुरणे,
तुझ्यावीना हासणे मला नवे नाही।।

तु म्हणजे हिरवळ, फुलानची दरवळ,
तसेही ऊन्हाळे मला नवे नाही ।।

...
sandip s. jagtap

my blog:






गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०२३

रात्र भर वाट तुझी पाहत राहीलो

रात्र भर वाट तुझी पाहत राहीलो


रात्र भर वाट तुझी पाहत राहीलो ।।
पण तु आलीच नाही, 
मग चंद्रामध्येच रूप तुझे पाहत राहीलो ।।
दोष नाहीच तुझा,
दोष आंधाऱ्या रात्रीला मी देत राहीलो ।।
रात्र भर वाट तुझी पाहत राहीलो ।।

पण तु आलीच नाही
कवेत चंद्राची किरणे मी घेत राहीलो ।।
देण्यासारखे माझ्याकडे नव्हतेच काही
भेट ताऱ्यांची  आभाळाला देत राहीलो ।।
रात्र भर वाट तुझी पाहत राहीलो ।।

ऊधळण दवांची आंगावर घेत राहीलो ।।
नशा रात्रीची एकटाच मी पीत राहीलो।।
काळीज ठेवले तुझ्यासाठी,
धुक्यांबर जरी मी वाहत राहीलो ।।
रात्र भर वाट तुझी पाहत राहीलो ।।

शब्द जरी तु तुझा पाळला नाही
दोष तुला नाही शब्दाला त्या देत राहीलो ।।
रात्र भर वाट तुझी पाहत राहीलो ।।
पण तु आलीच नाही, 
मग चंद्रामध्येच रूप तुझे पाहत राहीलो ।।

...
sandip s. jagtap

my blog:







सोमवार, ९ ऑक्टोबर, २०२३

सारख आसच होतय

सारख आसच होतय।।

माहीत नाही का नेहमी,
सारख आसच होतय।।
पहिल्या प्रेमात झाले होते,
आगदी तसच होतय।।

फुलपाखरु होऊन मन
सार जग फिरून घेतय ।।
क्षीतीजावरती आभाळ 
जमिनीच्या खुषीत येतय।। 

माहीत नाही का नेहमी,
सारख आसच होतय।।

गुलाबांच्या पाकळ्यांवरच दव
मन ऊन होऊन पेतय ।।
पाहाटेचे मंद वारे ही आता
आमचेच गीत गातय ।।

माहीत नाही का नेहमी,
सारख आसच होतय।।

समुद्राला भेटाय पाणी
निरंतर वाहात जातय ।।
मंद काळोख्या रात्री
समुद्राला भरत येतय ।।

माहीत नाही का नेहमी,
सारख आसच होतय।।
पहिल्या प्रेमात झाले होते,
आगदी तसच होतय।।

...
sandip s. jagtap

my blog:










गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३

पाऊस

पाऊस
शब्द जरी  जुने आसले
कविता मात्र नवी आहे ||
पाऊस काय येईल जाईल
पावसात ती हावी आहे।। 

ओले केस घेऊन तिने
आडोशाला माझ्या यावे।।
ओठांवरचे पाणी तिच्या
ओठांवरती माझ्या द्यावे।।
बेभाण व्हावे पावसाने
अन समुद्राला भरते यावे।।

पाऊस जरी जुनाच आसला
सर मात्र नवी आहे ।।
पाऊस काय येईल जाईल
पावसात ती हावी आहे।।

ओल्या चिंब अंगाला तिच्या
पावसाने कंप फुटावे ।।
सुर्यानेही  झोपी जाऊन 
दुसऱ्या दिवशी निवांत ऊठावे।।
काळ्या कुठ्ठ आंधाराणे
आकाशातील ताऱ्यांना लुटावे ।।

आकाश जरी जुनेच आसले
रात्र ती नवी आहे ।।
पाऊस काय येईल जाईल
पावसात ती हावी आहे।।

दूसरऱ्या दिवशी पुन्हा एकदा
आभाळ ढगांनी भरून यावे।।
झिरझिरणारऱ्या पावसामध्ये
फुलांनीही फुलुन घ्यावे ।।

फुल जरी जुनेच आसले
कहाणी त्याची नवी आहे ।।
पाऊस काय येईल जाईल
पावसात ती हावी आहे।।

शब्द जरी  जुने आसले
कविता मात्र नवी आहे ||
पाऊस काय येईल जाईल
पावसात ती हावी आहे।।

...
sandip  s.  jagtap

my blog:


















शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३

राहुन गेले

राहुन गेले
शाळेमध्ये प्रेम करायचे राहुन गेले ।।
कॉलेजही तुला दुरून पाहुन गेले।।
आज विचारणार होतो एकदाचे तुला
पण सकाळी सकाळी तुझे बाब
तुझ्या लग्नाची पत्रीका देऊन गेले ।।
शाळेमध्ये प्रेम करायचे राहुन गेले ।।

आलो तरीही लग्नाला तुझ्या
लग्न तुझे दोन आश्रू देऊन गेले।।
पेत होतो मी दु:ख विरहाचे
बाकी सारे पोटभर जेवुन गेले।।

शाळेमध्ये प्रेम करायचे राहुन गेले ।।
कॉलेजही तुला दुरून पाहुन गेले।
...
sandip jagtap

my blog:

शुक्रवार, १७ मार्च, २०२३

बक्षीस

बक्षीस

बक्षीस म्हणून मॅनेजमेंटने
दिले सदाफुलीचे झाड।।
निगा राखा निट म्हणाले
म्हणजे  लवकर लागेल पाड।।

मोठ झाल्यानंतर त्याच
झाडाखाली करू आपण पार्टी।।
कारण नसताना कोणीही
चढायचे नाही वरती।।

फळे आल्यावरती ही
 तुम्हीच आपापसात वाटुन घ्या।।
वाटल तर निगा राखण्यासाठी
रोज तासभर लवकर या।।

...
sandip jagtap

my blog:






 

बुधवार, १५ फेब्रुवारी, २०२३

जगत राहिलो

जगत राहिलो

जरी सोडून गेली ती,
तीची वाट बघत राहिलो।।
वाटले होते मरेल आता ,
तरी पण जगत राहिलो।।

तिच्या पेक्षाही भेटेल भारी,
मिच मला बोलत गेलो।।
माझाच हात घेऊन हातात,
कित्येक मैल चालत गेलो।।

भेटली मलाही एक,
आगदी तिच्याच सारखी।।
समजावले खुप मनाला,
पण ती ती नव्हती।।

तिच्या मध्येच तिला,
मग  मी बघत राहिलो।।
वाटले होते मरेल आता ,
तरी पण जगत राहिलो।।

मला ति मिळाली नाही,
पण मि ही तिला मिळालो नाही।।
तिही थोडी जळलीच ना प्रेमात,
मिच एकटा जळालो नाही।।

जुनेच स्वप्न आजही ,
नव्याने मी बघत राहिलो
वाटले होते मरेल आता ,
तरी पण जगत राहिलो।।

....
sandip jagtap

my blog:






 

गुरुवार, ८ डिसेंबर, २०२२

नको लागु नादाला तिच्या

नको लागु नादाला तिच्या

नको लागु नादाला तिच्या
तुझ्या आधी ही खुप आहे।।
आवडतो जो चेहरा तुला
दाखवायचे रुप आहे।।

तुझ्या आधी मि ही होतो
रांगेमधे फुल घेऊन ।।
रोजचीच ति निराशा
जायचो मग फुल पेऊन।।

तिच्या ओठांवरची लालि कधी 
माझ्या ओठांवरही आली होती।।
तुला देते स्माईल जी
मिच तिला दिली होती।।

कदाचित तुझी होईलही ति
कधी माझी ही झाली होती ।।
दिली आसेल शप्पथ  जन्म मरणाची
ती पण मिच तिला दिली होती।।

देईल सोडुन तुला 
एक दिवस वाऱ्यावरती।।
लिहशिल तु ही कविता
एक दिवस माझ्यासारखी।।

पाहुन हासेल तुला
हासवणारे हि खुप आहे।।
आवडतो जो चेहरा तुला
दाखवायचे रुप आहे।।

नको लागु नादाला तिच्या
तुझ्या आधी ही खुप आहे।।

sandip jagtap






शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२

पहिला घोट घेता घेता

पहिला घोट घेता घेता

दाता खाली खडा लागला
चणे फुटाणे खाता खाता !!
पहिल्या प्रेमाची आठवण झाली
पहिला घोट घेता घेता !!

जेव्हा ती पहिल्यांदा दिसली !!
माझ्याकडे पाहुन गालात हासली !!

हे ही मला मित्रांनीच सांगितलले
माझ्याच पैशांची पिता पिता   !!
पहिल्या प्रेमाची आठवण झाली
पहिला घोट घेता घेता !!

नजरेचेच बाण मग
काळजाला भिडु लागले !!
पाहण्यासाठी तिची एक आदा
डोळे आपापसात लढु लागले !!

बाणा मागे बाण सुटले 
प्रेम आमचे होता होता !!
पहिल्या प्रेमाची आठवण झाली
पहिला घोट घेता घेता !!

बागेमधल्या पहिल्याच भेटीत
घेतले तिला मी आसे मिठीत !!
झिरझिरणारया पावसाचे थेंब 
मग दोघांमध्ये बसलो वाठीत !!

पाऊसही मग थकुन गेला
वाठणी आमची होता होता !!
पहिल्या प्रेमाची आठवण झाली
पहिला घोट घेता घेता !!

प्रेमामध्ये भांडणाचे
 खटके थोडे ऊडु लागले !!
पाण्यामध्ये आलकोहोलचे
प्रमाण थोडे वाढु लागले !!

बाटल्या मागुन बाटल्या संपल्या 
ब्रेक अप आमुचा होता होता !!
पहिल्या प्रेमाची आठवण झाली
पहिला घोट घेता घेता !!


sandip jagtap



मंगळवार, ७ जून, २०२२

ss

सगळ्याच कविता आनुभवातुन लिहायच्या नसतात काही कल्पनेतून ही लिहाव्या लागतात

सगळ्याच कविता आनुभवातुन लिहायच्या म्हटलं तर


रोज कोणासाठी तरी
झुरावे लागले आसते
रोज कोणासाठी तरी
मरावे लागले आसते

कंटाळले आसते लोक
रोज जाळायला ही
स्वतःच स्वतःला
पूरावे लागले आसते

Sandip jagtap

my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com

बुधवार, २५ मे, २०२२

तुच सांग

तुच सांग मला
माझे प्रेम खोटे होते
कि तूझे प्रेम खोटे होते
मिच घेतले मिठीत जरी
हात तुझे कोठे होते
तुच सांग मला

तुझा नी माझा एक झाला 
तो श्वास खोटा होता
का तुझ्या ओठांना झाला
 तो त्रास खोटा होता
मी आहेच बेईमान पण
तुझे ईमान कोठे होते

तुच सांग मला
माझे प्रेम खोटे होते
कि तूझे प्रेम होते


तु उशाला घेतला तो चंद्र खोटा होता
की तुझ्यासाठी आंथरले ते तारे खोटे होते




सोमवार, १६ मे, २०२२

ह्रदय

नको डोकावू ह्रदयात माझ्या
ह्रदय माझे खोल आहे
जाइल कधीही तोल तुझा
हे अनुभवाचे बोल आहे

बुधवार, ११ मे, २०२२

तु विसरुन जा

दिसणार नाही आता
मी स्वप्नातही तुला।।
मी विसरून जातो तुला
तु ही विसरून जा मला।।

लग्न जमलेला जेव्हा
मेसेज तुझा आला।।
मेसेज बरोबर मी 
तूझा नंबरही डिलेट केला।।

दिसणार नाही आता
मी स्वप्नातही तुला।।
मी विसरून जातो तुला
तु ही विसरून जा मला।।

नको खाऊ तू मनाला
तूझी चुक नाही काही।।
प्रेमात पडण्याची
मीच केली होती घाई।।

नको हिशोब प्रेमाचा
आता परवडणार नाही मला।।
मी विसरून जातो तुला
तु ही विसरून जा मला।।

विसरून जा त्या भेटी
विसरून जा ती मिठी।।
विसरून जा ते शब्द
होते तुझ्या त्या ओठी।।

विसरून जा तो श्वास
जो दोघांचा एक झाला।।
मी विसरून जातो तुला
तु ही विसरून जा मला।।

sandip s. jagtap


my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com

सोमवार, १९ जुलै, २०२१

पहिले प्रेम

पहिले प्रेम
शाळेत असताना मलाही 
एक आवडत होती परी !!
काम काढून येणे-जाणे
वाढवले तिच्या घरी !!

दोन वेण्या सुंदर मुखडा
गालामध्ये ती हसायची !!
गालावरची खळी ती 
खोट्या रागाने पुसायची !!

काळेभोर केस तिचे
ओठांवरती लाली !!
वसंत ऋतुत फुटावी पालवी
अवस्था माझी झाली !!

तिची नजर शोधत मला
वर्गात चांदणे पसरायची !!
पण प्रेमात हरवलो होतो मी
ती हृदयात पाहायला विसरायची !!

नसेल असा तुटला तारा 
मगायचे तीला मी राहिले !!
कदाचित तिच तोडत असेल तारे
मीच तिला ना पाहिले !!

मी तिच्यावर मरत होतो
तिही माझ्यावर मरत होती !!
घरच्यांच्या अपेक्षा खाली
स्वप्न स्वतःचे पुरत होती !!

हेच ते पहिले प्रेम 
ती भेटली नाही जरी !!
शाळेत असताना मलाही 
एक आवडत होती परी !!

मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०२१

माझ्यासाठी पण कधी, लिहीत जा

तुझ्यासाठी नेहमीच, करतो कवीता मी

माझ्यासाठी पण कधी, लिहीत जा।। 

चंद्र, ताऱ्यांची उपमा नेहमीच देतो तुला 

अमावस्येच्या चंद्रात तरी, मला पाहत जा।। 

माझी होणार  नाही तु माहीत आहे मला

पण माझ्या कवितेची तरी होत जा।।

माझ्यासाठी  तुही कधी,  दोन शब्द लिहत जा।।


sandip s.  jagtap


सोमवार, ८ फेब्रुवारी, २०२१

तुझ्यासाठी

तुझ्यासाठी मी ही
एक कविता केली होती

समजू नये कोणाला म्हणून
फास्ट लिपीत लिहीली होती
चंद्र सूर्य ताऱ्यांची उपमा
मि ही तुला दिली होती

तुझ्यासाठी मी ही 
एक कविता केली होती 

एक दिवस असाच
तुला देण्यासाठी आलो 
पण मी येण्याअगोदरच
 तू निघून गेली होती

तुझ्यासाठी मी ही 
एक कविता केली होती 

पुन्हा एक दिवस थोडा पाऊस येत होता
मी कविता देण्यासाठी आलो पण 
मीच काय माझी कविताही तुला भेली होती 
तुला देण्या अगोदरच पावसाने भिजून गेली होती

 तुझ्यासाठी मी ही
 एक कविता केली होती


 ------ संदीप जगताप-------

मंगळवार, २ फेब्रुवारी, २०२१

हरीण

हरीण

बेधुंद धावते  हरीण
घेऊन पायामध्ये प्राण।।
काट्याकुट्यातून वाटं 
मागे भुकेलेले श्वान।।

थकल्या पावलांनी कसे 
तुडवती माळरान।।
 वेढले चहूबाजूंनी 
आता पायात नव्हते त्राण।।

थकलेल्या जीवाला मग
अपुरे पडले रान।।
 घेतला शेवटचा श्वास
 टाकली त्याने मान ।।

महागाईच्या दुनियेमध्ये
आज स्वस्त झाले प्राण ।।
पाहूनीया  हे सारे 
न हेलावले मन ।।

कारण हेच आहे जग 
हेच आहे जीवन।।
sandip s. jagtap


my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com

बुधवार, २० जानेवारी, २०२१

बरे वाटते

कविता केल्याने
मनाला थोडे बरे वाटते ।।
तुमची  लाईक आल्यावरती
लिहिलेले थोडे खरे वाटते।।

sandip s.  jagtap




तुझ्या दिसण्यावर

तुझ्या दिसण्यावर
रोज कविता करतो मी ।।
तुझ्या हसण्यावर 
रोज नव्याने मरतो मी।।
देण्यासाठी  भेट तुला 
तारे गोळा करत गगणात फिरतो मी।।

sandip jagtap

चुकीचा मार्ग

चुकीच्या मार्गाने चालण्यापेक्षा
माघारी फिरलेलंच बर।।
पावसात भिजण्यापेक्षा पाणी
जमिनीत मुरलेलच बर।।
पावसात भिजुन दगडाला
अंकुर फुटणार नाही।। 
क्षितीजामागे पळुन कधी
आभाळ भेटणार नाही।l

sandip jagtap






 



सोमवार, १८ जानेवारी, २०२१

प्रेम

मी तुझ्यावर प्रेम करतो 
मनापासून आणि आवडीने।।
तुही माझ्यावर प्रेम करावे
जमेल तसे  आणि सवडीने।।
नसेल जरी प्रेम तुझे
अडचण मला काही नाही।।
निवांत सांग होईल तेव्हा
मलाही लगेच घाई नाही।।

-------   संदीप जगताप -----@@


रविवार, १० जानेवारी, २०२१

कळत नकळत

मी कोणी कवी अथवा लेखक नाही
पण कधी कधी वेळच आशी येते
कळत नकळत एखादी कविता बनुन जाते।।

सकाळचे सहा वाजले की कॉलेजची घाई होते 
साडेदहाला लेक्चर पण ती थोडी लवकर येते 
दारामधून आत येताना तीची माझी नजरानजर होते 
कळत नकळत एखादी कविता बनून जाते।। 

पहिले लेक्चर सुरू होते
लक्ष मात्र सारखे तिच्या कडे जाते 
चुकून कधी तिही माझ्याकडे पाहते 
कळत नकळत एखादी कविता बनून जाते।।

दुसरे लेक्चर सुरू होते
माझ्या नावाबरोबर कोण तीचेही नाव घेते
रागवतो मित्रांवर पण मन मात्र खूश होते
कळत नकळत एखादी कविता बनुन जाते।।

शेवटच्या लेक्चरला मी थोडा नाराज होतो
तिला पाहण्यासाठीच आज कॉलेजला आलो होतो
माझ्याबरोबर न बोलतच जेव्हा ती निघून जाते
कळत नकळत एखादी कविता बनून जाते।।
 
रात्रीही मग तिच्या विचारातच झोप येते 
झाली असेल सकाळ म्हणून,
जेव्हा तासातासाला जाग येते 
कळत नकळत एखादी कविता बनून जाते।।

sandip jagtap

मंगळवार, २९ डिसेंबर, २०२०

घोडचूक

घोडचूक झाली आणि लव मॅरेज केले
 रात्रंदिवस काम करून गाल आत गेले
 70 किलो वजन माझे चाळीस किलो झाले
घोडचूक झाली आणि लव मॅरेज केले।।

लग्नाआधी बोलत होती खूप काम करीन
 दिवसातून चार वेळा झाडु मी मारीन
झाडू हातात  घेतलेले सहा महिने झाले
घोडचूक झाली आणि लव मॅरेज केले।।

 आठवड्यातुन सहा वेळा शॉपिंग साठी जाते
 येताना हातामध्ये  चार चार बँग घेऊन येते 
दहा हजार कर्ज माझे सहा लाख झाले
घोडचूक झाली आणि लव मॅरेज केले।।

 महिन्यातून दहा दिवस हिचे आईबाप येतात 
जाताना शेतामधून माल घेऊन जातात
माल नेहुन नेहुन माझे चार एकर गेले
घोडचूक झाली आणि लव मॅरेज केले।।

 आज हि तिच्या वरती खूप मरत आहे 
रुपयाही न घेता जशे घर काम करत आहे
 सांगताना डोळ्यांमध्ये पाणी थोडे आले
घोडचूक झाली आणि लव मॅरेज केले।।

sandip jagtap

बुधवार, २३ डिसेंबर, २०२०

सोमवार, १४ डिसेंबर, २०२०

भुलना चाहता हुं

आज तक बहुत पी दारु
अब दारु के बिना जिना चाहता हुं||
भुल जाऊंगा उस रम को लेकीन 
भुलने केलिए थोडा पिना चाहता हुं||

sandip jagtap

शनिवार, १३ जून, २०२०

अजून हरलो नाही

आजून हारलो नाही


 जिंकलो नसेल जरी
 आजून  हारलो नाही
 पाहुनी संकटे कधी
 मी माघारी फिरलो नाही

 तो पेलाच समजा मला
 जो अजून भरला नाही
 भरला असेल कित्येकदा
 पण कोणालाच पुरला नाही

भरलो जरी पाण्यानेच
 तरी पाण्यावर तरलो नाही
 जिंकलो नसेल जरी
आजून हारलो नाही

 नसेल  सूर्या परी मोठा मी
 तरी चमकणे सोडले नाही
 राहून गगणात कधी
 मी ताऱ्यांना तोडले नाही

काजव्या परीच मी
कधी गगनात फिरलो नाही
जिंकलो नसेल जरी
आजून हारलो नाही

 रोजची नवी ती पहाट
ज्याने अंधार दूर जावा
 पानांवरच्या या दवांनी
 धरती ला पूर यावा

 रोजच जातो मीटुनी
जरी उद्याला उरलो नाही
जिंकलो नसेल जरी
आजून हारलो नाही

पाहुनी संकटे कधी
माघारी फिरलो नाही
जिंकलो नसेल जरी
आजून हारलो नाही

  संदीप जगताप

  http://sandipsjagtap.blogspot.com

बुधवार, १ एप्रिल, २०२०

२१ दिवस

२१ दिवस
२१ दिवस घरात बसल म्हणुन काही
आयुष्यच जळत नाही
 समजत नाही अशिक्षितांना जे कळतं
 ते शिक्षितांना का कळत नाही!!

 बाजारात भाजीपाल्याला रांगा लावण्यापेक्षा
 महिनाभर डाळभात खाल्ला  म्हणून कोणी मरणार  नाही
 कारण  आज घरात  नाही  बसला तर
परत भाजीपाला  खायला कोणी उरणार नाही!!

 नाही गेलं कामावर तर
असं काय होणार आहे
आज घरी बसला तरच
 पुढच्या महिन्यात कामावर जाणार आहे!!

 मला काही होत नाही म्हणून
 फेरफटका मारणारे पण खूप भेटतात
 तंबाखू आणायला जाणाऱ्यांनाही
 पोलीस रोज रेटतात !!

आजच थोडं घरी थांबा
 परत रोजच मिरवायच आहे
घरामध्ये बसून आज
करोनाला हरवायचे आहे!!

--sandip jagtap

my blog-  http://sandipsjagtap.blogspot.com

शनिवार, ७ डिसेंबर, २०१९

आज मी आभाळ जळताना पाहीलय

आज मी आभाळ जळताना पाहीलय

स्वता:पासुन दुर पळताना पाहीलय
मावळत्या सुर्याबर जळताना पाहीलय
खर होत की खोटं माहित नाही
पण धरतीला क्षितीजावर मीळताना पाहीलय

आज मी आभाळ जळताना पाहीलय

ढगांच्या कडकडाटासह स्वताशिच
 बडबडताना पाहीलय
पावसाळ्यात का होईना
रडताना पाहीलय
दु:खाचे ढग पोटामधे घेउन
निरंतर पळताना पाहीलय
आव्हानानच्या सुर्याला
 गिळताना पाहीलय

आज मी आभाळ जळताना पाहीलय

तुटलेल्या तारयानला तारताना पाहीलय
मनातल्या मनात झुरताना पाहीलय
मातीच गुणगान गाताना पाहीलय
जमीनीकडे चोरून पाहताना पहीलय
प्रेमाचे पञ लीहताना पाहीलय
वारयाबर कोणाला देताना पाहीलय
चंद्र तारयानबर खेळताना पाहीलय
स्वता:पासुन दुर पळताना पाहीलय

आज मी आभाळ जळताना पाहीलय


my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com

गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१९

लाज

लाज
होती नव्हती सोडुन सारी
कशाला हवाय साज
राखुन ठेवाव्या भावना थोड्या
थोडी राखून ठेवावी लाज

ऊत्साहाच्या भारात काही
होतील चुका आज
निघून जाईल तारूण्य एक दिवस
निघून जाईल साज

वास्तवाच्या लख्ख काळोखात
तेव्हा दिसणार नाही ताज
म्हणून
राखुन ठेवाव्या भावना थोड्या
थोडी राखून ठेवावी लाज

पानेच होत नाही झाडांची जेथे
वडाला कावळ्यांवरती नाज
सोडुन जातील सारे जे जे
सावलीला होते आज

उघडतील डोळे तेव्हा आर्त मारावी हाक
नात्यांच्या भिंतीला धडकुन
आपलाच येईल आवाज
म्हणून
राखुन ठेवाव्या भावना थोड्या
थोडी राखून ठेवावी लाज

Sandip s. Jagtap


my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com





गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९

सहजच लिहतोय थोडस वाटलं म्हणून

सहजच लिहतोय थोडस वाटलं म्हणून
(कहाणी पुरग्रस्तांची)

सहजच लिहतोय  आज
थोडस वाटलं म्हणून
तसाही काय फरक पडतो कोणाला
इतभर अभाळ फाटल म्हणून

रोजच होतात येथे चोर्‍यामार्‍या
आज मालकानेच घर लुटल म्हणून
सहजच लिहतोय  आज
थोडस वाटलं म्हणून

पै पै गोळा करून बांधलेले घर
डोळ्यासमोर वाहत होत
सार गाव हे काठावर
बसून पाहत होत

कष्टाची ठिगळ जोडून शिवलेले
नशीब डोळ्यासमोर फाटल म्हणून
सहजच लिहतोय  आज
थोडस वाटलं म्हणून

पोरीच्या लग्नाची तयारीही
आजच करुन ठेवली होती
घरचीही त्यामुळे खुप दिसानी
आज पोटभर जेवली होती

साडी, चोळी, धोतर तर  फाटलेलच आसत
आज स्वप्नही त्याच्याबरोबर फाटल म्हणून
सहजच लिहतोय  आज
थोडस वाटलं म्हणून

घामाच्या भरोश्यावरच आज
पेरणी करून झाली होती
पोळ्याला सजवलेली जोड पाहुन
कशी छाती भरून आली होती

पुर ओसरल्यावर सर्जा राज्याकडे पाहून
भर पावसात काळीज पेटल म्हणून
सहजच लिहतोय  आज
थोडस वाटलं म्हणून

थोडी मदत करायची म्हटल
आम्ही खाली वर पाहतो
दहा रुपयांची मदत करताना
पन्नास फोटो घेतो

काय फरक पडणारय समुद्रातुन
घोटभर पाणी आटल म्हणून
सहजच लिहतोय  आज
थोडस वाटलं म्हणून

---  Sandip s. Jagtap


my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com

सोमवार, १७ जून, २०१९

भिकारी

भिकारी

काय नशिबीही आले
आली हातामधे वाटी
 घेतो पाठीवर काठी
सर्व काही पोटासाठी

नाही आई बापाचा पत्ता
नाही घर मालमत्ता
काय पडतो फरक
आली कोणाचीही सत्ता

भीक मागुनीया पीळ
आतड्याच्या या सोडतो
पुढच्या जन्मी नको पोट
देवा हातमी जोडतो

हात करताना पुढ
जीव तीळ तीळ तुटे
भीडे नजरेला नजर
बांध आसवांचा सुटे

झोपताना रोज आसे
उद्याचीही आस
ताटामध्ये निघो रोज
कोणाच्या तरीऔ केस

रस्त्यांनी पोर फीरे
रोज सुट आणि बुट
आमचा एकच सदरा
त्याला रोज नवी गाठ

देवा दिलास जन्म
नशीब कार लिहिल नाय
सांग झाली काय चुक
पुन्हा करणार नाय


---  Sandip s. Jagtap


my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com

बुधवार, १ मे, २०१९

जायचे आसेल तुला

जायचे आसेल तुला 

जायचे आसेल तुला
तु खुशाल सोडुन  जा
पण  जाता जाता  तुला  बांधलेला
तो ताजमहाल  मोडून  जा ॥

असशील  तू  सागर  सौंदर्याचा
मीच  होतो किनारा
नशेने  भरलेला गच्च पेला तू
मीच  होतो  पीणारा ॥

जायचे आसेल तुला
तु खुशाल सोडुन  जा
पण  जाता जाता  तो रीकामा पेला
तुझ्या  हाताने फोडून  जा ॥

जायचे आसेल तुला
तु खुशाल सोडुन  जा ॥

तु फुलांची  बाग सुंदर
मीच  पाणी  देणारा
गुलाबाचे सुंदर फुल  तु
मीच  काट्यासहीत घेणारा ॥

जायचे आसेल तुला
तु खुशाल सोडुन  जा
पण  जाता जाता  त्या जखमा
तुझ्या  हाताने खोडुन  जा ॥

जायचे आसेल तुला
तु खुशाल सोडुन  जा ॥

तु सुंदर वसंत  ऋतू
मी पाऊस  हाळुवार येणारा
तु सकाळ  पहाट सुंदर
मी वारा गात  जाणारा ॥

जायचे आसेल तुला
तु खुशाल सोडुन  जा
पण  जाता जाता  तो गंध  मातीचा
 माझ्या  साठी सोडुन  जा ॥

जायचे आसेल तुला
तु खुशाल सोडुन  जा ॥

रोज  तुझे ते  नखरे  नवीन
मीच होतो  पाहणारा
रोज  मॅचींग ड्रेस  तूझे
मीच  बील  देणारा ॥

जायचे आसेल तुला
तु खुशाल सोडुन  जा
पण  जाता जाता  ते पान
हीशोबाचे तुझ्या हाताने फाडून  जा ॥

जायचे आसेल तुला
तु खुशाल सोडुन  जा
पण  जाता जाता  तुला  बांधलेला
स्वप्नातला तो ताजमहाल  मोडून  जा ॥

जायचे आसेल तुला
तु खुशाल सोडुन  जा ॥

---  Sandip s. Jagtap

my blog 

गुरुवार, १० जानेवारी, २०१९

प्रेम कवी

प्रेम कवी
मनात आले एकदा
आपणही व्हावे प्रेम कवी;
पण त्याच्यासाठी होती
एक गर्लफ्रेंड हावी॥

पोरी बगत बगत मग
फीरु लागलो गावोगावी;
वाटत होत आपणही आता
होणार प्रेम कवी॥

फीरत फीरत एकदा
आसाच फँड्री मध्ये गेलो;
तोंडाला काळे लाऊन
थोड जब्यासारखा झालो॥

पाहावे म्हटल आपल्यालाही
भेटेल एकादी शालु;
ऊन्हामध्ये फीरुन फीरुन
खरच जब्यासारखा झालो॥

फँड्री मधुन तसाच झालो
टाइमपासला रवाना;
होऊन पाहावे म्हटल
थोडा प्राजुचाही दीवाना॥

प्राजु बरोबर माझ काही
ठीगाळ जुळल नाय;
तीच्यापाय दोनदीवस
जेवनही मीळल नाय॥

बस झाला टाइमपास
म्हटल बस झाला फँड्री;
करुन पाहु आता
थोडी दुनीयादारी॥

सीरीनला प्रपोज करुन
खरच स्वप्नील झाल्यासारख वाटल;
घोळाण्याबरोबर फक्त माझ
थोबाडही फुटल॥

होऊन थोड गयराट
मग गेलो सैराट गावात;
होता थोडा जोश
होतो थोडा तावात॥

गेल्या गेल्याच लांबुन
तेथे दीसली एक आरची;
म्हटल देवाला हीच्या तरी
चांगली आसुदे घरची॥

थोडी माहीती काडल्यावर समजल
ही पण आहे पाटलाच्याच घरची;
सैराट गावात लागली
जशी पहिल्याच घासाला मीरची॥

काय आहे आरचीत म्हटल
आता चालेल एकादी आणी;
पाहुन एक टपरी मग
मागाय गेलो पाणी॥

पाणी घेता घेता हाळुच
हात तीचा धरला;
आन काय सांगु तीने
तांब्याच फेकुन मारला॥

मारलेला तांब्या मग
तसाच आलो घेऊन;
वर्ल्ड कप भेटला जसा
प्रेम कवी होऊन॥

-sandip s. jagtap


my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com

गुरुवार, २५ ऑक्टोबर, २०१८

का देवा

का देवा
का देवा मी मागतो,
 ते कधीच  मला  मिळत नाय॥
एवढेही  आवघड नाही  शब्द,
जे की तुला  कळत  नाय॥

आश्रुच आहेत  शब्द आणि
पान आहे  धरणी माय॥
का देवा मी मागतो,
 ते कधीच  मला  मिळत नाय॥

फाड एकदाचे आभाळ म्हटल
तु जमीनच फाडतो,
वितभर काढले मुंडे वर
पुन्हा जमीनीतच गाढतो॥
जळल जरी शिवार येथे
काळीज माञ जळत नाय॥
             
का देवा मी मागतो,
 ते कधीच  मला  मिळत नाय॥
एवढेही  आवघड नाही  शब्द,
जे की तुला  कळत  नाय॥

घेऊन उभे पीक सारे तो
पाखरांनाच पोसतो,
खाण्यापीण्याचा प्रश्न फक्त
त्याच्या लेकरांचाच आसतो॥
ऊन्हा तान्हात ऊभा वृक्ष तो
का सावली त्याला मिळत नाय॥

का देवा मी मागतो,
 ते कधीच  मला  मिळत नाय॥
एवढेही  आवघड नाही  शब्द,
जे की तुला  कळत  नाय॥

भुक नाही आज सांगुन आई
ऊपाशीच झोपी जाते,
मुठभर भातावरच बापाचेही
जेवन होते॥
आसुण पुढे सारे जेवण
घास माञ गिळत नाय॥

का देवा मी मागतो,
 ते कधीच  मला  मिळत नाय॥
एवढेही  आवघड नाही  शब्द,
जे की तुला  कळत  नाय॥

कर्जाचा डोंगर ऊभा हा
ढग त्याला का आढत नाय,  
अश्रूंचाच ओलावा येथे
पाऊस कधी पडत नाय॥
 पाणी नाही येथे म्हणुन
पापण्या का जळत नाय॥

का देवा मी मागतो,
 ते कधीच  मला  मिळत नाय॥
एवढेही  आवघड नाही  शब्द,
जे की तुला  कळत  नाय॥

लग्नाची पोर घरी अन
बांधलेले स्वन ऊरी,
तुच सांग देवा कशी
गळ्यात बांधावी दोरी॥
पाहुन सारे देवा काळीज
तुझे का जळत नाय॥

का देवा मी मागतो,
 ते कधीच  मला  मिळत नाय॥
एवढेही  आवघड नाही  शब्द,
जे की तुला  कळत  नाय॥

आश्रुच आहेत  शब्द आणि
पान आहे  धरणी माय॥
का देवा मी मागतो,
 ते कधीच  मला  मिळत नाय॥

  Sandip jagtap

my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com



शनिवार, २३ जून, २०१८

गुलाबाचे फुल

गुलाबाचे फुल

का  आन किती दिवस
हे आसेच होत राहणार
आन  आम्ही ही ते उघड्या
डोळ्यांनी पहात राहणार.

प्रेम करणार तुम्ही आन
आम्ही साक्षीदार होणार
तुमचे काहीही झाले तरी
बळी माञ आमचा जाणार.

का आन किती दिवस
हे आसच होत राहणार.

कोण घेणार प्रेमाने
कोण  फेकून देणार
चूका करणारे करणार
बदनाम माञ आम्ही होणार.

का आन किती दिवस
हे आसच होत राहणार.

कधी फ्रेडशीप डे तर
कधी  valentine day
रोज कोणतरी मार खाणार
मार खाऊद्या कोणीहि
जीव तर आमचाच जाणार.

का आन किती दिवस
हे आसच होत राहणार.

कधी कोणाचा  birthday
 कधी कोणाचे लग्न होणार
आम्ही माञ हे सारे
सूकल्या देठाणे पाहत राहणार.

का आन किती दिवस
हे आसच होत राहणार.

कधी आन कोण आमच्याकडे
एक जीव म्हणून पाहणार
तुम्ही सुगंध घ्या पण
आम्हाला मोकळा श्वास कधी देणार.

का  आन किती दिवस
हे आसेच होत राहणार
आन  आम्ही ही ते उघड्या
डोळ्यांनी पहात राहणार.
_____sandip jagtap

संदीप जगताप
my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com

सोमवार, ५ मार्च, २०१८

मराठी कविता - पण का कुणास ठाऊक°°°°°°°°°

मराठी कविता - पण का कुणास ठाऊक°°°°°°°°°

MSC ला admission घेतले
तेव्हाच आयुष्याची राख झाली.
होती थोडीफार आशा तिही
 Qc मध्ये येऊन खाक झाली.
                                         तिच राख भरुन झोळीत
                                         बाजारात जाव वाटते
                                         राख भरायला घेतल्यावरच
                                         झोळीही आमची फाटते.
पण का कुणास ठाऊक
 Qc  वरती एखादी कविता कराविशी वटते..
                                         Qc मध्ये काम करणे
                                         तारेवरची कसरत असते
                                         महीन्या दोन महीन्यातून
                                         तब्येत आमची घसरत असते.
काहीच काम होत नाही
जरी दिवसभर पळत असतो
 Qa, production  कड़े पाहून
log book संगे जळत असतो.
                                         सोड़ुन हे सरे
                                          फकीर होऊन फिरावे वाटते
पण का कुणास ठाऊक
 Qc  वरती एखादी कविता कराविशी वटते..
                                          ऑड़ीट साठी राञभर थांबतो
                                          increament च्या आशेवर
                                          आरशात पाहुन खुप हासतो
                                          स्वताःच्याच दशेवर,
चार पाच महिने झाले की
या ऑड़ीट चा जाळ होतो
मटन शिजेपर्यंत येथे
तांदळाचा मात्र गाळ होतो
                                       increament ची पोळी
                                       यावरच भाजावी वाटते.
                                        हातात मात्र आमच्या
                                      एक सुखी रोटी भेटते
पण का कुणास ठाऊक
 Qc  वरती एखादी कविता कराविशी  वटते..
                                        घरी गेलो तरी एक प्रश्न
                                        नेहमीच करत आसतो त्रस्त
                                        आम्हाला कोठे जायचं
                                    तेव्हाच तुमच ऑड़ीट कस असते.
समजून सांगेपर्यंत तीला
घरातील   glasware सारे फूटते
पण का कुणास ठाऊक
 Qc  वरती एखादी कविता कराविशी वटते..

  sandip jagtap

    my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com

बुधवार, २७ सप्टेंबर, २०१७

love of chemist boy

love of chemist boy
 जेव्हा तिला मी पाहिले मी
माझं नावही विसरून गेलो होतो,
मणाचे  electron देऊन तिला
carbocation  झालो होतो.

मन नेहमी माझं तीझ्यासाठीच 
झुरत आहे,
 प्रेम  होण्यासाठी आमचे
 catalyst हि प्रेयत्न करत आहे.

तीला पाहण्यामध्ये एक  
 alcohol  ची नशा असते,
जेव्हा ती दिसत नाही 
sodium metal सारखी दशा असते.

जेव्हा ती जवळ असते
nitrous oxide चा भास होतो,
जेव्हा ती जवळ नसते
oxygen चा ही त्रास होतो.

काय माहित साला प्रेमामध्येही एवढा
 chemical लोचा असतो,
एवढ्या  reaction सोडुन तर
मी univarsity मध्ये first आलो असतो.

                sandip jagtap

    my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com