गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१९

लाज

लाज
होती नव्हती सोडुन सारी
कशाला हवाय साज
राखुन ठेवाव्या भावना थोड्या
थोडी राखून ठेवावी लाज

ऊत्साहाच्या भारात काही
होतील चुका आज
निघून जाईल तारूण्य एक दिवस
निघून जाईल साज

वास्तवाच्या लख्ख काळोखात
तेव्हा दिसणार नाही ताज
म्हणून
राखुन ठेवाव्या भावना थोड्या
थोडी राखून ठेवावी लाज

पानेच होत नाही झाडांची जेथे
वडाला कावळ्यांवरती नाज
सोडुन जातील सारे जे जे
सावलीला होते आज

उघडतील डोळे तेव्हा आर्त मारावी हाक
नात्यांच्या भिंतीला धडकुन
आपलाच येईल आवाज
म्हणून
राखुन ठेवाव्या भावना थोड्या
थोडी राखून ठेवावी लाज

Sandip s. Jagtap


my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा