Thursday, August 22, 2019

सहजच लिहतोय थोडस वाटलं म्हणून

सहजच लिहतोय थोडस वाटलं म्हणून
(कहाणी पुरग्रस्तांची)

सहजच लिहतोय  आज
थोडस वाटलं म्हणून
तसाही काय फरक पडतो कोणाला
इतभर अभाळ फाटल म्हणून

रोजच होतात येथे चोर्‍यामार्‍या
आज मालकानेच घर लुटल म्हणून
सहजच लिहतोय  आज
थोडस वाटलं म्हणून

पै पै गोळा करून बांधलेले घर
डोळ्यासमोर वाहत होत
सार गाव हे काठावर
बसून पाहत होत

कष्टाची ठिगळ जोडून शिवलेले
नशीब डोळ्यासमोर फाटल म्हणून
सहजच लिहतोय  आज
थोडस वाटलं म्हणून

पोरीच्या लग्नाची तयारीही
आजच करुन ठेवली होती
घरचीही त्यामुळे खुप दिसानी
आज पोटभर जेवली होती

साडी, चोळी, धोतर तर  फाटलेलच आसत
आज स्वप्नही त्याच्याबरोबर फाटल म्हणून
सहजच लिहतोय  आज
थोडस वाटलं म्हणून

घामाच्या भरोश्यावरच आज
पेरणी करून झाली होती
पोळ्याला सजवलेली जोड पाहुन
कशी छाती भरून आली होती

पुर ओसरल्यावर सर्जा राज्याकडे पाहून
भर पावसात काळीज पेटल म्हणून
सहजच लिहतोय  आज
थोडस वाटलं म्हणून

थोडी मदत करायची म्हटल
आम्ही खाली वर पाहतो
दहा रुपयांची मदत करताना
पन्नास फोटो घेतो

काय फरक पडणारय समुद्रातुन
घोटभर पाणी आटल म्हणून
सहजच लिहतोय  आज
थोडस वाटलं म्हणून

---  Sandip s. Jagtap


my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com

3 comments:

  1. सर हा कवितेचा कोणता प्रकार आहे ?

    ReplyDelete

नव्हतीच माणसे आपली, त्यांना मी आपली समजत होतो लावत होते मीठच सारे, मी त्याला खपली समजत होतो Sandip s. Jagtap