Thursday, September 21, 2023

पाऊस

पाऊस
शब्द जरी  जुने आसले
कविता मात्र नवी आहे 
पाऊस काय येईल जाईल
पावसात ती हावी आहे

ओले केस घेऊन तिने
आडोशाला माझ्या यावे
ओठांवरचे पाणी तिच्या
ओठांवरती माझ्या द्यावे
बेभाण व्हावे पावसाने
अन समुद्राला भरते यावे

पाऊस जरी जुनाच आसला
सर मात्र नवी आहे 
पाऊस काय येईल जाईल
पावसात ती हावी आहे

ओल्या चिंब अंगाला तिच्या
पावसाने कंप फुटावे 
सुर्यानेही  झोपी जाऊन 
दुसऱ्या दिवशी निवांत ऊठावे
काळ्या कुठ्ठ आंधाराणे
आकाशातील ताऱ्यांना लुटावे 

आकाश जरी जुनेच आसले
रात्र ती नवी आहे ।।
पाऊस काय येईल जाईल
पावसात ती हावी आहे

दूसरऱ्या दिवशी पुन्हा एकदा
आभाळ ढगांनी भरून यावे
झिरझिरणारऱ्या पावसामध्ये
फुलांनीही फुलुन घ्यावे 

फुल जरी जुनेच आसले
कहाणी त्याची नवी आहे 
पाऊस काय येईल जाईल
पावसात ती हावी आहे

शब्द जरी  जुने आसले
कविता मात्र नवी आहे 
पाऊस काय येईल जाईल
पावसात ती हावी आहे 

...
sandip  s.  jagtap

my blog:


















No comments:

Post a Comment

नव्हतीच माणसे आपली, त्यांना मी आपली समजत होतो लावत होते मीठच सारे, मी त्याला खपली समजत होतो Sandip s. Jagtap