Monday, July 19, 2021

पहिले प्रेम

पहिले प्रेम
शाळेत असताना मलाही 
एक आवडत होती परी !!
काम काढून येणे-जाणे
वाढवले तिच्या घरी !!

दोन वेण्या सुंदर मुखडा
गालामध्ये ती हसायची !!
गालावरची खळी ती 
खोट्या रागाने पुसायची !!

काळेभोर केस तिचे
ओठांवरती लाली !!
वसंत ऋतुत फुटावी पालवी
अवस्था माझी झाली !!

तिची नजर शोधत मला
वर्गात चांदणे पसरायची !!
पण प्रेमात हरवलो होतो मी
ती हृदयात पाहायला विसरायची !!

नसेल असा तुटला तारा 
मगायचे तीला मी राहिले !!
कदाचित तिच तोडत असेल तारे
मीच तिला ना पाहिले !!

मी तिच्यावर मरत होतो
तिही माझ्यावर मरत होती !!
घरच्यांच्या अपेक्षा खाली
स्वप्न स्वतःचे पुरत होती !!

हेच ते पहिले प्रेम 
ती भेटली नाही जरी !!
शाळेत असताना मलाही 
एक आवडत होती परी !!

No comments:

Post a Comment

नव्हतीच माणसे आपली, त्यांना मी आपली समजत होतो लावत होते मीठच सारे, मी त्याला खपली समजत होतो Sandip s. Jagtap