Tuesday, September 24, 2024

नको कांगावा पाणी ओतायचा
झोपडी केव्हाची पेटुन गेली
आता लावतेस मलम कशाला
जखम काळजाला आतुन झाली

करू नकोस आरोप कोणावर
चुक तर माझ्याच हातून झाली
मी विश्वास ठेवला त्या पहाटेवर
जी आंधाराला रात्रीच भेटुन आली

..... sandip s. jagtap



No comments:

Post a Comment

प्रत्येकांसाठी पाऊस वेगळा वेगळा आसतो कोणाला तो खिडकीतुन बघण्यासाठी आसतो तर कोणाचा पाऊस हा जगण्यासाठी आसतो कोणाला तो तळहातावर मोत्यांसारखा दि...