तिची माझी फक्त अशी एक भेट झाली
किनाऱ्यावर जशी हळुवार लाट आली
मी बसलो आठवणी गिरवत तेथेच
पुसायला आठवणी पुन्हा तीच लाट आली
बरा होतो मी, अंधारात एकटाच
खरे चेहरे दाखवाया का पुन्हा पहाट झाली
तिची माझी फक्त अशी एक भेट झाली
किनाऱ्यावर जशी हळुवार लाट आली
sandip s. jagtap
my blog-
No comments:
Post a Comment