गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०२३

रात्र भर वाट तुझी पाहत राहीलो

रात्र भर वाट तुझी पाहत राहीलो


रात्र भर वाट तुझी पाहत राहीलो ।।
पण तु आलीच नाही, 
मग चंद्रामध्येच रूप तुझे पाहत राहीलो ।।
दोष नाहीच तुझा,
दोष आंधाऱ्या रात्रीला मी देत राहीलो ।।
रात्र भर वाट तुझी पाहत राहीलो ।।

पण तु आलीच नाही
कवेत चंद्राची किरणे मी घेत राहीलो ।।
देण्यासारखे माझ्याकडे नव्हतेच काही
भेट ताऱ्यांची  आभाळाला देत राहीलो ।।
रात्र भर वाट तुझी पाहत राहीलो ।।

ऊधळण दवांची आंगावर घेत राहीलो ।।
नशा रात्रीची एकटाच मी पीत राहीलो।।
काळीज ठेवले तुझ्यासाठी,
धुक्यांबर जरी मी वाहत राहीलो ।।
रात्र भर वाट तुझी पाहत राहीलो ।।

शब्द जरी तु तुझा पाळला नाही
दोष तुला नाही शब्दाला त्या देत राहीलो ।।
रात्र भर वाट तुझी पाहत राहीलो ।।
पण तु आलीच नाही, 
मग चंद्रामध्येच रूप तुझे पाहत राहीलो ।।

...
sandip s. jagtap

my blog:







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा