तरूणाईला लागला, आसा एक शाप आहे
तरूणाईला लागला, आसा एक शाप आहे
राजकारणी नेता येथे तरुणाईचा बाप आहे
तुमच्या आमच्या साठीच हे, बदलतात झेंडे रोज
भ्रष्टाचार ही तर फक्त विरोधकांची थाप आहे
तरूणाईला लागला, आसा एक शाप आहे
राजकारणी नेता येथे तरुणाईचा बाप आहे
विष जातीचे रक्तामध्ये भिनवतात हे थोडे थोडे
खरे विषारी हेच सारे, बदनाम मात्र साप आहे
एका आदेशावरती, दगड घेऊन निघतो आम्ही
गरीबांचे आडकतात हो, यांना सारे माफ आहे
तरूणाईला लागला, आसा एक शाप आहे
राजकारणी नेता येथे तरुणाईचा बाप आहे
sandip s. jagtap
my blog-
http://sandipsjagtap.blogspot.com
No comments:
Post a Comment