Thursday, February 22, 2024

तीही बहुतेक माझ्या प्रेमात पडत आहे

तीही  बहुतेक माझ्या प्रेमात पडत आहे

वाटले होते आगदी तसेच घडत आहे
तीही  बहुतेक माझ्या प्रेमात पडत आहे

बोलणे माझ्याशी तिचे बिल्कुल होत नाही
एकांतात ती आता एकटी बडबडत आहे
तीही  बहुतेक माझ्या प्रेमात पडत आहे

चेहऱ्यावर आहे तिच्या वेगळी चमक आता
गालावर आता तिच्या खळी पडत आहे
तीही  बहुतेक माझ्या प्रेमात पडत आहे

पाहून आरशात एकटीच हासते ती
आठवणीत माझ्या एकटी रडत आहे
तीही  बहुतेक माझ्या प्रेमात पडत आहे

तिलाही भेटीची माझ्या ओढ आशी लागली
सागराला लाटा जशा किणाऱ्याशी ओढत आहे
तीही  बहुतेक माझ्या प्रेमात पडत आहे


1 comment:

  1. साहेब मी दररोज तुमच्या id ला येऊन बघत असतो आज काय नवीन आहे का काही तरी दररोज एखादी कविता टाकत जा राव

    ReplyDelete

नव्हतीच माणसे आपली, त्यांना मी आपली समजत होतो लावत होते मीठच सारे, मी त्याला खपली समजत होतो Sandip s. Jagtap