सोमवार, २७ नोव्हेंबर, २०२३

गारपीठ

गारपीठ

चुकलच देवा भरोसा तुझाव ठेवला
तुझा जिवाव संसार सारा पणाला लावला

सार ऊसन करून पिक जोमत आणल
लेकरा परीस जिव पिकाला लावला
 
आजची गारपीठ सार घेऊनच गेली
पाठीचा कणा वाकल्या सपराला लावला 

अवंदा कांद्याच्या पैशाव तुला घेईल सदरा
खोट्याच आशेव यंदाही लेकाला ठेवला

पुढच्या वर्षी व्यजासहीत करीन परत  
थकला बापही आज सालाने ठेवला

सार घरदार बघ आज ऊपाशी झोपल
ज्याच्या जिवावर सारा जमाना जेवला

आश्रुच पिऊन बाप आज ऊपाशी झोपला
भाबड्या आईने तुला नौवद गोडवा ठेवला

पहाणी कराया सरकार बांधावर आले
फोटो काढुन त्यांनी निवडणुकीला ठेवला

चुकलच देवा भरोसा तुझाव ठेवला
तुझा जिवाव संसार सारा पणाला लावला



....
sandip s. jagtap

my blog:


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा