मी कोणी कवी अथवा लेखक नाही
पण कधी कधी वेळच आशी येते
कळत नकळत एखादी कविता बनुन जाते।।
सकाळचे सहा वाजले की कॉलेजची घाई होते
साडेदहाला लेक्चर पण ती थोडी लवकर येते
दारामधून आत येताना तीची माझी नजरानजर होते
कळत नकळत एखादी कविता बनून जाते।।
पहिले लेक्चर सुरू होते
लक्ष मात्र सारखे तिच्या कडे जाते
चुकून कधी तिही माझ्याकडे पाहते
कळत नकळत एखादी कविता बनून जाते।।
दुसरे लेक्चर सुरू होते
माझ्या नावाबरोबर कोण तीचेही नाव घेते
रागवतो मित्रांवर पण मन मात्र खूश होते
कळत नकळत एखादी कविता बनुन जाते।।
शेवटच्या लेक्चरला मी थोडा नाराज होतो
तिला पाहण्यासाठीच आज कॉलेजला आलो होतो
माझ्याबरोबर न बोलतच जेव्हा ती निघून जाते
कळत नकळत एखादी कविता बनून जाते।।
रात्रीही मग तिच्या विचारातच झोप येते
झाली असेल सकाळ म्हणून,
जेव्हा तासातासाला जाग येते
कळत नकळत एखादी कविता बनून जाते।।