शनिवार, २८ ऑक्टोबर, २०२३

बघ तुला जमतय का

 बघ तुला जमतय का

करत आहे जी चुक मी
तुही एकदा करुन बघ ।।
रखरखता विस्तव एकदा
तळहातावर धरून बघ ।।

उगवणार नाही माहीत आहे
तरी या उजाड माळावर,
बिज प्रेमाचे पेरायला
बघ तुला जमतय का ।।

वारा येईल निरोप घेऊन
त्याला थोडा वेळ थांबव ।।
बोलणार नाही काहीच तो
तरी संभाषण थोड लांबव ।।

माझ्या मनातल सांगीतलय सगळ,
तुझ्या मनातलही सांगायला
बघ तुला जमतय का ।।

मि न लिहीलेले कोरे पत्र वाच
बघ काय समजतय का ??
मी न बोलताच ऐकण्याचा प्रयत्न कर 
बघ काय उमजतय का ??

उमजणार नाही काहीच तुला,
तरी समजण्याचा प्रयत्न कर
बघ तुला जमतय का ।।

आभाळातल्या ताऱ्यांनला
थोडावेळ जमिनीवर बोलव ।।
तुझ्याबरोबर त्यानां ही
दोन पावल चालव ।।
 
आता बघ त्या एकट्या चंद्राकडे, 
त्या चंद्राला समजुन घ्यायला
बघ तुला जमतय का ।।

आता आभाळ ढगांनी
दाटुन येईल ।।
सहनशिलतेच छप्पर
फाटुन जाईल ।।

आता कधीही कोसळेल सर 
ति सर आऋंची थांबवायला
बघ तुला जमतय का ।।

़़़़़sandip s. jagtap
my blog:

गुरुवार, २६ ऑक्टोबर, २०२३

मला नवे नाही

मला नवे नाही

 तुझे आयुष्यात येणे, तुझे दूर जाणे
 तु माझी असणे, तु माझी नसणे
 हे सारे आता, मला नवे नाही।।

तुझ्यासाठी जगणे, तुझ्यासाठी मरणे, 
तुझ्यामागे फिरणे, तुझ्यासाठी झुरणे,
तुझ्यावीना हासणे मला नवे नाही।।

तु म्हणजे हिरवळ, फुलानची दरवळ,
तसेही ऊन्हाळे मला नवे नाही ।।

...
sandip s. jagtap

my blog:






गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०२३

रात्र भर वाट तुझी पाहत राहीलो

रात्र भर वाट तुझी पाहत राहीलो


रात्र भर वाट तुझी पाहत राहीलो ।।
पण तु आलीच नाही, 
मग चंद्रामध्येच रूप तुझे पाहत राहीलो ।।
दोष नाहीच तुझा,
दोष आंधाऱ्या रात्रीला मी देत राहीलो ।।
रात्र भर वाट तुझी पाहत राहीलो ।।

पण तु आलीच नाही
कवेत चंद्राची किरणे मी घेत राहीलो ।।
देण्यासारखे माझ्याकडे नव्हतेच काही
भेट ताऱ्यांची  आभाळाला देत राहीलो ।।
रात्र भर वाट तुझी पाहत राहीलो ।।

ऊधळण दवांची आंगावर घेत राहीलो ।।
नशा रात्रीची एकटाच मी पीत राहीलो।।
काळीज ठेवले तुझ्यासाठी,
धुक्यांबर जरी मी वाहत राहीलो ।।
रात्र भर वाट तुझी पाहत राहीलो ।।

शब्द जरी तु तुझा पाळला नाही
दोष तुला नाही शब्दाला त्या देत राहीलो ।।
रात्र भर वाट तुझी पाहत राहीलो ।।
पण तु आलीच नाही, 
मग चंद्रामध्येच रूप तुझे पाहत राहीलो ।।

...
sandip s. jagtap

my blog:







सोमवार, ९ ऑक्टोबर, २०२३

सारख आसच होतय

सारख आसच होतय।।

माहीत नाही का नेहमी,
सारख आसच होतय।।
पहिल्या प्रेमात झाले होते,
आगदी तसच होतय।।

फुलपाखरु होऊन मन
सार जग फिरून घेतय ।।
क्षीतीजावरती आभाळ 
जमिनीच्या खुषीत येतय।। 

माहीत नाही का नेहमी,
सारख आसच होतय।।

गुलाबांच्या पाकळ्यांवरच दव
मन ऊन होऊन पेतय ।।
पाहाटेचे मंद वारे ही आता
आमचेच गीत गातय ।।

माहीत नाही का नेहमी,
सारख आसच होतय।।

समुद्राला भेटाय पाणी
निरंतर वाहात जातय ।।
मंद काळोख्या रात्री
समुद्राला भरत येतय ।।

माहीत नाही का नेहमी,
सारख आसच होतय।।
पहिल्या प्रेमात झाले होते,
आगदी तसच होतय।।

...
sandip s. jagtap

my blog: