बुधवार, २८ फेब्रुवारी, २०२४

पाठीवर केले, आज वार तीने

पाठीवर केले, आज वार तीने

ह्रदयात छेडली होती, तार जिने
पाठीवर केले, आज वार तीने

शस्त्रात कोणत्या ताकत होती
मग शब्दांनाच लावली धार तीने 

जखमाही मला समजल्या नाहीत
आसे घाव केले हळुवार तीने

जी फुले दिली मी, प्रेमाने तीला
माझ्यासाठी केले त्याचे हार तीने

दुःख ही मला हवेहवेसे वाटते
प्रेमात केले आसे बेजार तीने

गेलो घेऊन फुल गुलाबाचे तीला
हातात ठेवली होती तलवार तीने

ह्रदयात छेडली होती, तार जिने
पाठीवर केले, आज वार तीने





गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०२४

तीही बहुतेक माझ्या प्रेमात पडत आहे

तीही  बहुतेक माझ्या प्रेमात पडत आहे

वाटले होते आगदी तसेच घडत आहे
तीही  बहुतेक माझ्या प्रेमात पडत आहे

बोलणे माझ्याशी तिचे बिल्कुल होत नाही
एकांतात ती आता एकटी बडबडत आहे
तीही  बहुतेक माझ्या प्रेमात पडत आहे

चेहऱ्यावर आहे तिच्या वेगळी चमक आता
गालावर आता तिच्या खळी पडत आहे
तीही  बहुतेक माझ्या प्रेमात पडत आहे

पाहून आरशात एकटीच हासते ती
आठवणीत माझ्या एकटी रडत आहे
तीही  बहुतेक माझ्या प्रेमात पडत आहे

तिलाही भेटीची माझ्या ओढ आशी लागली
सागराला लाटा जशा किणाऱ्याशी ओढत आहे
तीही  बहुतेक माझ्या प्रेमात पडत आहे


शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

आसे काही नाही

आसे काही नाही

मिळाली सहज तर ठेवतो जवळ
भेटलीच पाहीजे आसे काही नाही

पाजली कोणी तर पितो बळच
घेतलीच पाहीजे आसे काही नाही

आहे तेवढ्यात मी आहे समाधानी 
बाटलीच पाहीजे आसे काही नाही

लागेल तशी मी हातानेच घेईल
ओतलीच पाहीजे आसे काही नाही

शेंगदाने फुटानेही चालतील मला
चकलीच पाहीजे आसे काही नाही

जास्तीची झाली तरीही सहन करतो
ओकलीच पाहीजे आसे काही नाही

गाडीही माझी आसते बेताची
ठोकलीच पाहीजे आसे काही नाही

न घाबरताही मी घरामध्ये जातो
ती झोपलीच पाहीजे आसे काही नाही

न बोलताच काही गप झोपुनही घेतो
ती भांडलीच पाहीजे आसे काही नाही

sandip s. jagtap
 my

गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०२४

माझे जगणे

माझे जगणे

माझे जगणे मी,
तुझे आयुष्यात येण्यात पाहिले
आन तुझे सुख तू,
माझ्या निघून जाण्यात पाहिले

 शब्द जरी तुझे,
 काळीज चिरुन जात होते
 प्रत्येक शब्द तुझे,
 मी माझ्या गाण्यात पाहिले

तुझ्या टपोऱ्या डोळ्यांमध्ये
असा मी हरवून गेलो
तुझ्या खोट्या सौंदर्यापुढे
चंद्र सूर्य पाण्यात पाहिले

जरी हातात तुझ्या,
मी खंजिर देखले होते
तरी जगणे मी,
तुला मिठीत घेण्यात पाहिले

sandip s. jagtap
 my