शुक्रवार, ३१ मे, २०२४

बिना नावाची नाती

बिना नावाचीच बघ
आसतात  काही नाती
ज्याच्या साठी आजवर
किती जागल्या मी राती

नाही काहीच जवळ
तरी हारवण्याची भीती
सांग फुलाचा सुगंध
त्याला जपावा तरी किती

सांग आभाळाला तुझ्या 
मला बरी आहे माती
होते ढगांचेही पाणी
फक्त तीच्या भेटी साठी

बिना नावाचीच बघ
आसतात काही नाती

sandip s. jagtap

शुक्रवार, २४ मे, २०२४

राखण करतो ज्याची
ते गबाळ माझे नाही
अन जेथे चंद्र माझा
ते आभाळ माझे नाही

sandip s. jagtap

मंगळवार, ७ मे, २०२४

आज शब्दही धोका देऊन गेले


आज शब्दही धोका देऊन गेले

माणसानचे ठीक आहे हो,
आज शब्दही धोका देऊन गेले
तुटके शेर माझ्या साठी आन
मतला माझा घेऊन गेले

वाटले होते गझल माझी
पुर्ण होईन तुझ्या साथीने
जरी दुख: गेले ठेऊन मला
रदीफ, काफिया घेऊन गेले

माणसानचे ठीक आहे हो,
आज शब्दही धोका देऊन गेले

---  Sandip s. Jagtap
my blog-
http://sandipsjagtap.blogspot.com


शनिवार, ४ मे, २०२४

जाता जाता

जाता जाता तुला आज
मनभरुन पाहुन घेतो
तुझ्या शिवाय राहण्याची
सवय मनाला लावुन घेतो

तुझ्या बरोबर कँफी पिण्याचे
स्वप्न स्वप्नच राहुन देतो
तू तूझी कँफी पिऊन घे
मिही माझी पिऊन घेतो 

जाता जाता तुला आज
मनभरुन पाहुन घेतो

---  Sandip s. Jagtap
my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com




शुक्रवार, ३ मे, २०२४

परक्यानपासुन थोडे दुरूनच राहावे
स्वत:  पुरते थोडे ऊरुनच राहावे

कापुर होण्यापेक्षा ऊदबत्तीच बरे
राखेपुरते तरी पुरूनच राहावे

---  Sandip s. Jagtap
my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com

बुधवार, १ मे, २०२४

मला न सांगताच

मला न सांगताच

मला न सांगताच तु,
जेव्हा निघुन जाते बघ
भकास होते सारी दुनीया,
भकास सारे होते जग

विसरुन जाते जरी मन,
आठवण येते तरी पण
खोटे खोटे हासता हासता
डोळ्यात पाणी येते बघ

मला न सांगताच तु,
जेव्हा निघुन जाते बघ

---  Sandip s. Jagtap
my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com