बुधवार, १६ ऑक्टोबर, २०२४

खुप दिवसांनी आज तीचा

मेसेज आला कसा आहे...

आग वेडे बदलली तर तू

मी जसा होतो तसा आहे...

 Sandip S. Jagtap

मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०२४

पांघरले आभाळ प्रेमाचे जरी

पाय माञ शेवटी उघडेच होते 

तिच्या साठी जोडले हात जेथेही

ते सारे रंगलेले दगडेच होते


पाहीली वाट आयुष्यभर तीची

मेलो तरी डोळे ऊघडेच होते

तीही रडालीच मेल्यावर मी

रडणारे आता सगळेच होते

 

Sandip s. jagtap

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०२४

करणार होतो कॉल तुला पण

तु पहिल्या सारखी राहीली नाही

कालच काढली होती आठवण

ती अजुनही तु पाहिली नाही


Sandip s. jagtap






  ,  

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०२४

जर आलीच आठवण कधी
तर नीरोप दे त्या वाऱ्याकडे
मी पाहतच आसेल तिकडे
तुही पाहा त्याच ताऱ्याकडे

sandip s. jagtap

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०२४

स्वप्नच होत ते

स्वप्नच होत ते,

स्वप्नच होत ते, मला खरे वाटत होते,
पण वास्तवा पेक्षा तेच बरे वाटत होते

भांडण्यातही होत प्रेमच तीच्या
आन मला ते वादळ वारे वाटत होते

काजव्यांचा घोंगाट होता भोवताली
काळोखात मला ते तारे वाटत होते

खरा गोडवा तीच्या  बोलण्यात होता
 मला ते नेहमीच  खारे वाटत होते

स्वप्नच होत ते, मला खरे वाटत होते,
पण वास्तवा पेक्षा तेच बरे वाटत होते

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०२४

फक्त रड म्हणा

फक्त रड म्हणा


(फक्त लढ म्हणा या कवी कुसुमाग्रज यांच्या कवीतेचे वीडंबन)

ओळखलत का डाॅक्टर
दवखाण्यात आला कोणी,
कपडे होते  फाटलेले 
डोळ्यांमध्ये  पाणी ॥

क्षणभर  हसला गपकण बसला
बोलला दम खाऊन ,
लव लेटर द्यायला  गेलो 
तीने दिल्या  दोन  ठेवून॥ 

दोन  मिनिटात  तेथे
भाव तीचा पोहचला,
चपल्या टाकून  पळालो
जिव कसाबसा  वाचला ॥

हात मोडला , पाय मोडला 
कंबरटेच पार मोडले,
प्रसाद  म्हणून  घरी  येऊन 
बापानी तीच्या  झोडले॥ 

इंजेक्शन  कडे  हात जाताच
कसाबसा  उठला ,
इंजक्शन नको डाॅक्टर 
फक्त मुक्का मार बसला ॥

राहीलेले लव लेटर 
आता  लीहीत आहे,
मुक्का मार त्याची
आठवण देत  आहे॥

खाल्ला  एवढा  मार तरी 
मोडला नाही  कणा, 
पाठीवरती हात ठेवून
फक्त रड म्हणा॥

sandip jagtap

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०२४

चार आणे

चार आणे

खुप दिवसानंतर काल 
भेटले होते चार आणे
किंमतच राहीली नाही
सांगु लागले गाऱ्हाणे

दोन हाजाराची नोट मग
बोलली तोऱ्या तोऱ्याने
आम्हालाही याव लागत होत
नेहमी मागच्या दाराणे

हाजार पाचशेही बंद झाले
नोट बंदिच्या काहाराणे
शंभर दोनशे थकुन गेले
आर्थकारणाच्या भाराणे

कोण मोठा कोण लहान
सगळ्यांचेच आहेत हाल
चार आण्याला भेटल्यावर
सारे लक्षात आले काल

sandip s. jagtap

my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com