शनिवार, ७ डिसेंबर, २०१९

आज मी आभाळ जळताना पाहीलय

आज मी आभाळ जळताना पाहीलय

स्वता:पासुन दुर पळताना पाहीलय
मावळत्या सुर्याबर जळताना पाहीलय
खर होत की खोटं माहित नाही
पण धरतीला क्षितीजावर मीळताना पाहीलय

आज मी आभाळ जळताना पाहीलय

ढगांच्या कडकडाटासह स्वताशिच
 बडबडताना पाहीलय
पावसाळ्यात का होईना
रडताना पाहीलय
दु:खाचे ढग पोटामधे घेउन
निरंतर पळताना पाहीलय
आव्हानानच्या सुर्याला
 गिळताना पाहीलय

आज मी आभाळ जळताना पाहीलय

तुटलेल्या तारयानला तारताना पाहीलय
मनातल्या मनात झुरताना पाहीलय
मातीच गुणगान गाताना पाहीलय
जमीनीकडे चोरून पाहताना पहीलय
प्रेमाचे पञ लीहताना पाहीलय
वारयाबर कोणाला देताना पाहीलय
चंद्र तारयानबर खेळताना पाहीलय
स्वता:पासुन दुर पळताना पाहीलय

आज मी आभाळ जळताना पाहीलय


my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com

गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०१९

लाज

लाज
होती नव्हती सोडुन सारी
कशाला हवाय साज
राखुन ठेवाव्या भावना थोड्या
थोडी राखून ठेवावी लाज

ऊत्साहाच्या भारात काही
होतील चुका आज
निघून जाईल तारूण्य एक दिवस
निघून जाईल साज

वास्तवाच्या लख्ख काळोखात
तेव्हा दिसणार नाही ताज
म्हणून
राखुन ठेवाव्या भावना थोड्या
थोडी राखून ठेवावी लाज

पानेच होत नाही झाडांची जेथे
वडाला कावळ्यांवरती नाज
सोडुन जातील सारे जे जे
सावलीला होते आज

उघडतील डोळे तेव्हा आर्त मारावी हाक
नात्यांच्या भिंतीला धडकुन
आपलाच येईल आवाज
म्हणून
राखुन ठेवाव्या भावना थोड्या
थोडी राखून ठेवावी लाज

Sandip s. Jagtap


my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com





गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९

सहजच लिहतोय थोडस वाटलं म्हणून

सहजच लिहतोय थोडस वाटलं म्हणून
(कहाणी पुरग्रस्तांची)

सहजच लिहतोय  आज
थोडस वाटलं म्हणून
तसाही काय फरक पडतो कोणाला
इतभर अभाळ फाटल म्हणून

रोजच होतात येथे चोर्‍यामार्‍या
आज मालकानेच घर लुटल म्हणून
सहजच लिहतोय  आज
थोडस वाटलं म्हणून

पै पै गोळा करून बांधलेले घर
डोळ्यासमोर वाहत होत
सार गाव हे काठावर
बसून पाहत होत

कष्टाची ठिगळ जोडून शिवलेले
नशीब डोळ्यासमोर फाटल म्हणून
सहजच लिहतोय  आज
थोडस वाटलं म्हणून

पोरीच्या लग्नाची तयारीही
आजच करुन ठेवली होती
घरचीही त्यामुळे खुप दिसानी
आज पोटभर जेवली होती

साडी, चोळी, धोतर तर  फाटलेलच आसत
आज स्वप्नही त्याच्याबरोबर फाटल म्हणून
सहजच लिहतोय  आज
थोडस वाटलं म्हणून

घामाच्या भरोश्यावरच आज
पेरणी करून झाली होती
पोळ्याला सजवलेली जोड पाहुन
कशी छाती भरून आली होती

पुर ओसरल्यावर सर्जा राज्याकडे पाहून
भर पावसात काळीज पेटल म्हणून
सहजच लिहतोय  आज
थोडस वाटलं म्हणून

थोडी मदत करायची म्हटल
आम्ही खाली वर पाहतो
दहा रुपयांची मदत करताना
पन्नास फोटो घेतो

काय फरक पडणारय समुद्रातुन
घोटभर पाणी आटल म्हणून
सहजच लिहतोय  आज
थोडस वाटलं म्हणून

---  Sandip s. Jagtap


my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com

सोमवार, १७ जून, २०१९

भिकारी

भिकारी

काय नशिबीही आले
आली हातामधे वाटी
 घेतो पाठीवर काठी
सर्व काही पोटासाठी

नाही आई बापाचा पत्ता
नाही घर मालमत्ता
काय पडतो फरक
आली कोणाचीही सत्ता

भीक मागुनीया पीळ
आतड्याच्या या सोडतो
पुढच्या जन्मी नको पोट
देवा हातमी जोडतो

हात करताना पुढ
जीव तीळ तीळ तुटे
भीडे नजरेला नजर
बांध आसवांचा सुटे

झोपताना रोज आसे
उद्याचीही आस
ताटामध्ये निघो रोज
कोणाच्या तरीऔ केस

रस्त्यांनी पोर फीरे
रोज सुट आणि बुट
आमचा एकच सदरा
त्याला रोज नवी गाठ

देवा दिलास जन्म
नशीब कार लिहिल नाय
सांग झाली काय चुक
पुन्हा करणार नाय


---  Sandip s. Jagtap


my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com

बुधवार, १ मे, २०१९

जायचे आसेल तुला

जायचे आसेल तुला 

जायचे आसेल तुला
तु खुशाल सोडुन  जा
पण  जाता जाता  तुला  बांधलेला
तो ताजमहाल  मोडून  जा ॥

असशील  तू  सागर  सौंदर्याचा
मीच  होतो किनारा
नशेने  भरलेला गच्च पेला तू
मीच  होतो  पीणारा ॥

जायचे आसेल तुला
तु खुशाल सोडुन  जा
पण  जाता जाता  तो रीकामा पेला
तुझ्या  हाताने फोडून  जा ॥

जायचे आसेल तुला
तु खुशाल सोडुन  जा ॥

तु फुलांची  बाग सुंदर
मीच  पाणी  देणारा
गुलाबाचे सुंदर फुल  तु
मीच  काट्यासहीत घेणारा ॥

जायचे आसेल तुला
तु खुशाल सोडुन  जा
पण  जाता जाता  त्या जखमा
तुझ्या  हाताने खोडुन  जा ॥

जायचे आसेल तुला
तु खुशाल सोडुन  जा ॥

तु सुंदर वसंत  ऋतू
मी पाऊस  हाळुवार येणारा
तु सकाळ  पहाट सुंदर
मी वारा गात  जाणारा ॥

जायचे आसेल तुला
तु खुशाल सोडुन  जा
पण  जाता जाता  तो गंध  मातीचा
 माझ्या  साठी सोडुन  जा ॥

जायचे आसेल तुला
तु खुशाल सोडुन  जा ॥

रोज  तुझे ते  नखरे  नवीन
मीच होतो  पाहणारा
रोज  मॅचींग ड्रेस  तूझे
मीच  बील  देणारा ॥

जायचे आसेल तुला
तु खुशाल सोडुन  जा
पण  जाता जाता  ते पान
हीशोबाचे तुझ्या हाताने फाडून  जा ॥

जायचे आसेल तुला
तु खुशाल सोडुन  जा
पण  जाता जाता  तुला  बांधलेला
स्वप्नातला तो ताजमहाल  मोडून  जा ॥

जायचे आसेल तुला
तु खुशाल सोडुन  जा ॥

---  Sandip s. Jagtap

my blog 

गुरुवार, १० जानेवारी, २०१९

प्रेम कवी

प्रेम कवी
मनात आले एकदा
आपणही व्हावे प्रेम कवी;
पण त्याच्यासाठी होती
एक गर्लफ्रेंड हावी॥

पोरी बगत बगत मग
फीरु लागलो गावोगावी;
वाटत होत आपणही आता
होणार प्रेम कवी॥

फीरत फीरत एकदा
आसाच फँड्री मध्ये गेलो;
तोंडाला काळे लाऊन
थोड जब्यासारखा झालो॥

पाहावे म्हटल आपल्यालाही
भेटेल एकादी शालु;
ऊन्हामध्ये फीरुन फीरुन
खरच जब्यासारखा झालो॥

फँड्री मधुन तसाच झालो
टाइमपासला रवाना;
होऊन पाहावे म्हटल
थोडा प्राजुचाही दीवाना॥

प्राजु बरोबर माझ काही
ठीगाळ जुळल नाय;
तीच्यापाय दोनदीवस
जेवनही मीळल नाय॥

बस झाला टाइमपास
म्हटल बस झाला फँड्री;
करुन पाहु आता
थोडी दुनीयादारी॥

सीरीनला प्रपोज करुन
खरच स्वप्नील झाल्यासारख वाटल;
घोळाण्याबरोबर फक्त माझ
थोबाडही फुटल॥

होऊन थोड गयराट
मग गेलो सैराट गावात;
होता थोडा जोश
होतो थोडा तावात॥

गेल्या गेल्याच लांबुन
तेथे दीसली एक आरची;
म्हटल देवाला हीच्या तरी
चांगली आसुदे घरची॥

थोडी माहीती काडल्यावर समजल
ही पण आहे पाटलाच्याच घरची;
सैराट गावात लागली
जशी पहिल्याच घासाला मीरची॥

काय आहे आरचीत म्हटल
आता चालेल एकादी आणी;
पाहुन एक टपरी मग
मागाय गेलो पाणी॥

पाणी घेता घेता हाळुच
हात तीचा धरला;
आन काय सांगु तीने
तांब्याच फेकुन मारला॥

मारलेला तांब्या मग
तसाच आलो घेऊन;
वर्ल्ड कप भेटला जसा
प्रेम कवी होऊन॥

-sandip s. jagtap


my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com