Thursday, December 25, 2025

आला आवाज ओळखीचा, रोखुन पाहिले मी

प्रकाश जुन्याच आठवणींवर टाकुन पाहिले मी


होते डोळ्यात पाणी, अशी एक भेटली गझल,

म्हणाली गेले सोडुन सारे, तरी टिकुन राहीले मी


नशा नशेलाच  माझी आज एवढी लागली की

आला आवाज तळातुन थोडी चुकुन राहीले मी


श्रीमंतीत तुझ्याबरोबर जरी थाटात जगले मी

गरीबीत मोकळ्या बाटल्या विकून राहिले मी


जीला समजत होतो आजवर सर्वात जवळचे 

माझ्यापासून दोन हात नेहमी राखून राहिली ती


आला आवाज ओळखीचा, रोखुन पाहिले मी

प्रकाश जुन्याच आठवणींवर टाकुन पाहिले मी


sandip s. jagtap

my blog-  http://sandipsjagtap.blogspot.com





























Saturday, December 20, 2025

कविता माझी तिच्यामध्ये हरवलेली

तीही माझ्या कवितेमध्ये हरवलेली

आता नका शोधू नाव तिचे येथे तेथे 

काळजात एक वही तिच्या नावाने गिरवलेली

sandip s. jagtap

my blog-  http://sandipsjagtap.blogspot.com


Friday, December 19, 2025

अंधाऱ्या रात्रीला आधार राहीला नाही

खुप दिवस झाले तो चंद्र पाहिला नाही 


केली असती आजही एखादी गझल तुझ्यावर  

पण आता तुझ्यावर माझा तो हाक्क राहीला नाही


sandip s. jagtap

my blog-  http://sandipsjagtap.blogspot.com

 

Monday, December 8, 2025

काल रात्री झोपडीला माझ्या आग लागली 

जळुन सारी खाक झाली, मगं लोक जागली


पेटण्या सारखे झोपडीत माझ्या नव्हतेच काही

बहुतेक छपराला काळजाची धग लागली


काल रात्री झोपडीला माझ्या आग लागली


sandip s. jagtap

my blog-

 http://sandipsjagtap.blogspot.com

 



Monday, October 20, 2025

पावसात भिजलो थोडा

मग पावसात विझलो थोडा

 

पावसाशीच तह केला

मग पावसात गाजलो थोडा


sandip s. jagtap

my blog-

 http://sandipsjagtap.blogspot.com

 

  

Saturday, September 27, 2025


पावसाची त्याला भीती कसली,

पाऊस ज्याच्या डोळ्यात राहतो

वाचवायचा नेमका जीव कोणता

निम्मा जिव त्याचा मळ्यात राहतो 


बिना जितराबाचा दोर जेव्हा 

नकळत त्याच्या गळ्यात जातो

मदतीचा महापुर तेव्हाच

भाषणे द्यायला तळ्यात वाहतो


Sandip s. Jagttap






Monday, September 22, 2025

तु वागते माझ्याशी, ते वागणे बरे आहे का ?

तुझी माझी फक्त एक भेट पुरे आहे का ?


वाचले चेहरे खुप माणसांचे आजवर

वाचले जे आजवर, ते चेहरे खरे आहे का?


sandip s. jagtap

my blog-

 http://sandipsjagtap.blogspot.com







Monday, September 1, 2025

चलो एक खेल खेलते है वफादारीका

मै हारने को तैय्यार हु..

तु खाली जितने की कोशिश तो कर


sandip s. jagtap

my blog-

 http://sandipsjagtap.blogspot.com

Saturday, August 30, 2025

तीला जेव्हा पहिल्यांदा पाहाणे झाले

नंतर भेटण्याचे हाजारो बहाणे झाले


समुद्राला ती कधी मिळालीच नाही 

फक्त तीचे खळखळ वाहाणे झाले


आजही तीच्याच आठवणीत जगतो

पण कमी तीचे  येणे-जाणे झाले 


लिहीले काही शेर ती गेल्यावरती

पुढे - पुढे त्याचे एक गाणे झाले


sandip s. jagtap

my blog-

 http://sandipsjagtap.blogspot.com













Thursday, August 14, 2025


नव्हतीच माणसे आपली,

त्यांना मी आपली समजत होतो

लावत होते मीठच सारे,

मी त्याला खपली समजत होतो

Sandip s. Jagtap


Saturday, August 2, 2025

आबला

आबला

देहच माझा आज विक्रिस काढला मी

पहिला निरोप मग तुलाच धाडला मी


लोकांच्या नजरेतुन जपले जे आजवर

माझ्याच हाताने तो कुर्ता फाडला मी


नजरा लोकांच्या त्या पाहुच कशा 

स्वत:च माझा मग डोळा काढला मी


मुखवटा घातलेले भेटले आजवर

सुसज्ज समाजाचा आरसा फोडला मी


मदतीला नेहमी जरी तुच होता हाजर

मनातला तुझ्या सैतान हेरला मी


पहिला निरोप मग तुलाच धाडला मी

देहच माझा आज विक्रिस काढला मी


sandip s. jagtap

my blog-

 http://sandipsjagtap.blogspot.com



Tuesday, July 8, 2025

तरूणाईला लागला, आसा एक शाप आहे

तरूणाईला लागला, आसा एक शाप आहे

 

तरूणाईला लागला, आसा एक शाप आहे 

राजकारणी नेता येथे तरुणाईचा बाप आहे


तुमच्या आमच्या साठीच हे, बदलतात झेंडे रोज

भ्रष्टाचार ही तर फक्त विरोधकांची थाप आहे 


तरूणाईला लागला, आसा एक शाप आहे 

राजकारणी नेता येथे तरुणाईचा बाप आहे


विष जातीचे रक्तामध्ये भिनवतात हे थोडे थोडे 

खरे  विषारी हेच सारे, बदनाम मात्र साप आहे


एका आदेशावरती, दगड घेऊन  निघतो आम्ही 

गरीबांचे आडकतात हो, यांना सारे माफ आहे 


तरूणाईला लागला, आसा एक शाप आहे 

राजकारणी नेता येथे तरुणाईचा बाप आहे


sandip s. jagtap

my blog-

 http://sandipsjagtap.blogspot.com




Saturday, June 14, 2025

पाऊस पडतो आहे बाहेर, थोडं पावसात फिरून येतो

तू भिजलीच असशील ना पावसात, एखादी कविता करून घेतो


तुझ्या ओठांवरून ओघळणारी ती सर, बघू कोठे भेटते का

कोसळणाऱ्या सरी साऱ्या, ओंजळीत भरून घेतो


 Sandip s . Jagtap

Saturday, May 31, 2025

तू कोठे मला कवितेत शोधते

मी पात्र त्यात एक भरकटलेले


तुझे स्वप्न म्हणजे फुलांची बाग 

मी एक पानं, तेही सुरकतलेले


तू म्हणजे दव्यातील कास पठार 

मी ओसाड माळरान, धुरकटलेले


तू कोठे मला कवितेत शोधते

मी पात्र त्यात एक भरकटलेले


sandip s. jagtap

my blog-

 http://sandipsjagtap.blogspot.com


Thursday, May 29, 2025

 हायकू 


मी समजले

तशी नव्हती ती

आज उमजले


Sandip jagtap

Sunday, May 25, 2025

पाऊस होता, पण भिजलो नाही 

वाऱ्यामध्ये ही, आज विझलो नाही

दरवळलो असेलही कदाचित पण

पहिल्यासारखा, आज झिजलो नाही

Sandip s. Jagtap



हायकु

भिजलो आज 

ना पावसामध्ये 

ना प्रेमामध्ये

Sandip s. Jagtap

ती विसरलीच होती मला 
मीही विसरलो होतो तिला 
आणि अचानक आले ढग 
अचानक पाऊस आला
चूक नेमकी कोणाची 
 दोष देऊ कोणाला 
तिला मला कि पावसाला

Monday, May 12, 2025

दुःख माझे जगासमोर मी पसरू कसे 
तूच सांग तुला आता मी विसरू कसे

हसतो आहे तरी विचारते काय झाले 
तुझ्यापासून सांग लपवू अश्रू कसे 

sandip s. jagtap

my blog-

 http://sandipsjagtap.blogspot.com

नको विचारू ही कविता कोणासाठी लिहीली आहे
कसे सांगु ही जिंदगी तुझाच हवाली केली आहे
नको राहु दुर आशी तु, नजरे समोरुन माझा
तुला पाहाण्याची, मनाला सवय किती झाली आहे

Sandip jagtap

Saturday, May 3, 2025


कधी कधी जगण्यापेक्षा मरणच बर वाटत 

गादीवर झोपण्यापेक्षा सरणच बर वाटत


मेलो म्हणून काय झाल, तीची भेट तर होईल

आज तरी माझ्या साठी, डोळ्यात पाणी येईल

 

वाईट वाटले तरी तु आजीबात रडायच नाही

हासत राहायच वचन, आजही मोडायचं नाही


एखादी माझी आठवण डोळ्यासमोरून जाईल 

चेहऱ्यावरचे भाव मग मी अंतःकरणाने पाहील


हे करण्यासाठी तुला वेळ तर भेटेल का

पण तु आली नाही तर चीता तरी पेटेल का

Sandip s. Jagtap








Sunday, April 27, 2025

भेटलीस पुन्हा कधी, डोळ्यात पाहू नको 

ओठांची सवय माझ्या, ओठांना लावू नको


पडेल पुन्हा मीही, तुझ्या प्रेमात कदाचित 

वेगळे होण्याचे पुन्हा, कारण देऊ नको 

भेटलीस पुन्हा कधी , डोळ्यात पाहू नको 


Sandip s. Jagtap

Tuesday, April 22, 2025



उपकार कर एकदा पुन्हा माझ्यावर 
दाखल कर एखादा गुन्हा माझ्यावर

काळीज नेहले चोरून माझे 
आसा आरोप कर तो जूना माझ्यावर

चक्रा माराव्या लागतील तुझ्या कोर्टात
नजर पडेल तुझी पुन्हा माझ्यावर

मीच होईल साक्षीदार तुझाही 
केस चालु दे पुराव्यावीना माझ्यावर


Sandip s. Jagtap

Friday, April 11, 2025

तिची माझी फक्त अशी एक भेट झाली 

किनाऱ्यावर जशी हळुवार लाट आली

मी बसलो आठवणी गिरवत तेथेच 

पुसायला आठवणी पुन्हा तीच लाट आली 


बरा होतो मी, अंधारात एकटाच 

खरे चेहरे दाखवाया का पुन्हा पहाट झाली 

तिची माझी फक्त अशी एक भेट झाली 

किनाऱ्यावर जशी हळुवार लाट आली


sandip s. jagtap

my blog-

 http://sandipsjagtap.blogspot.com

Wednesday, April 2, 2025

प्रेमात बरबाद झाल्यावर
तिची मग याद आल्यावर 
मनाला थोडे बरे वाटते 
पिऊनी फुल झाल्यावर

Sandip a. Jagtap

Thursday, March 20, 2025

Qc वरती एखादी कविता कराविशी वटते

Qc  वरती एखादी कविता करावी वटते..


MSC ला admission घेतले
तेव्हाच आयुष्याची राख झाली.
होती थोडीफार आशा तिही
 Qc मध्ये येऊन खाक झाली.

तिच राख भरुन झोळीत
बाजारात जावे वाटते
राख भरायला घेतल्यावरच
झोळी ही आमची फाटते.

 Qc  वरती एखादी
 कविता करावी वटते..

Qc मध्ये काम करणे
तारेवरची कसरत असते
महीन्या दोन महिन्यातून
तब्येत आमची घसरत असते.

काहीच काम होत नाही
जरी दिवसभर पळत असतो
 Qa, production  कड़े पाहून
log book संगे जळत असतो.

सोड़ुन हे सारे 
फकीर होऊन फिरावे वाटते
 Qc  वरती एखादी
 कविता करावी वटते..

ऑड़ीट साठी राञभर थांबतो
increament च्या आशेवर
आरशात पाहुन खुप हासतो
स्वताःच्याच दशेवर,

चार पाच महिने झाले की
या ऑड़ीट चा जाळ होतो
मटन शिजेपर्यंत येथे
तांदळाचा मात्र गाळ होतो

increament ची पोळी
यावरच भाजावी वाटते.
हातात मात्र आमच्या
एक कोरडी रोटी भेटते

 Qc  वरती एखादी
 कविता करावी  वटते..

घरी गेलो तरी एक प्रश्न
नेहमीच करत आसतो त्रस्त
आम्हाला कोठे जायचं
तेव्हाच तुमच ऑड़ीट कस आसत.

समजून सांगेपर्यंत तीला
घरातील   glasware सारे फूटते
पण का कुणास ठाऊक
 Qc  वरती एखादी कविता करावी वटते..

Tuesday, March 11, 2025

 तु सुंदर आहे, सुंदर बोललो

मग चुकले कोठे ?

वार केले तेही शब्दांचेच 

मग दुखले कोठे ?


ओठ तुझे आहेत सुंदर 

असे बोलतो फक्त 

ओठांवरती ओठ तुझे 

अजुनही टेकले कोठे ?


Sandip s. Jagtap

Sunday, February 23, 2025

खरं सांग आठवण माझी अजूनही येते का ग 

माझ्या मनात होतं तेच तुझ्या मनात होते का ग


बोलायला हाव होत, राहून राहून सारख वाटतं

बोलण्यासारखे खरंच काही दोघांमध्ये होते का ग 


खरं सांग आठवण माझी अजूनही येते का ग 


sandip s. jagtap

my blog-

 http://sandipsjagtap.blogspot.com




Thursday, February 13, 2025

आठवणींच ओझ सांग कुठवर वाहु

दोघांच्याही आहेत, दोघ वाटुनच घेऊ  ................

Sandip s. Jagtap

Monday, February 3, 2025

विसरलोच होतो तिला

विसरलोच होतो तिला की, समोर तारा तुटला

काय मागायचे आता, संयम पुन्हा एकदा सुटला 


तुटणाऱ्या तार्‍यापाशी पुन्हा तीलाच मागीतले 

पण ताराही आज जरासा एकटाच वाटला 


माझ्यात आणि त्याच्यात आज बरेच साम्य होते

मीही आतुन तुटलो होतो, आज तोही तुटला


ठेवला होता ज्यांच्यावर विश्वास दोघांनीही 

धोका मलाही भेटला, धोका त्यालाही भेटला


विसरलोच होतो तिला की, समोर तारा तुटला

काय मागायचे आता, संयम पुन्हा एकदा सुटला


sandip s. jagtap

my blog-

 http://sandipsjagtap.blogspot.com


Saturday, February 1, 2025

मी कधी कोणाची तक्रार करतो

मी कधी कोणाची तक्रार करतो 

मी कधी कोणाचा आता राग धरतो 


चंद्र सूर्य तारे कोठे राहिले आपले 

ऐकण्यास माझे फक्त अंधार उरतो


sandip s. jagtap

my blog-

 http://sandipsjagtap.blogspot.com





Wednesday, January 29, 2025

मतलबी झाले सारे जग, 

तसा मीही मतलबी झालो बघ


तु मला विसरुन गेली,

 मीही तुला विसरून गेलो बघ


........ Sandip s. Jagtap




Friday, January 24, 2025

आशी का वागते ती

 आशी का वागते ती

आज काल माझ्याशी आशी का वागते ती

दहाला झोपणारी, आता राञभर जागते ती


वाट पाहतो फक्त, तीच्या एका मेसेज ची

रिप्लायही देत नाही, जरी स्टेटस बघते ती


हवी होती फक्त तीला माझीच साथ मग 

हात जोडून देवाला, नेमके काय मागते ती


शोधु तरी  आता कोणत्या ठिकाणी तीला

विचारले तर बोलायची, स्वप्नामध्ये जगते मी


आज काल माझ्याशी आशी का वागते ती

दहाला झोपणारी, आता राञभर जागते ती


sandip s. jagtap

my blog-

  http://sandipsjagtap.blogspot.com








 


Sunday, January 12, 2025

वर वर जरी वाटत आसले

 वर वर जरी वाटत आसले, आता  तुला मि टाळत आहे 

आठवण आजही तेवढीच येते, पण दिला शब्द पाळत आहे 


वाटते करावा फोन तुला, आन बोलत राहावे तासन‌ तास

तसे जरी करत नसलो, तुझ्याच आठवणी चाळत आहे


हारवुन जात होतो कधी, आकाशातील ताऱ्यांमध्ये

तु सोडून गेल्यापासून बघ चंद्र ही कसा छळत आहे


पहिल्या सारख्या कविताही हल्ली हल्ली बनत नाही

गोळा केले शब्द सारे आन  ह्रदय  त्यावर जाळत आहे


वर वर जरी वाटत आसले, आता  तुला मि टाळत आहे 

आठवण आजही तेवढीच येते, पण दिला शब्द पाळत आहे


sandip s. jagtap

my blog-

  http://sandipsjagtap.blogspot.com

कविता माझी फक्त तुझ्यासाठी असावी तिची प्रत्येक ओळ तुझ्या ओठी असावी  सुटणार नाही आयुष्यभर कधीही  आशी तुझी माझी एक मीठी आसावी