रविवार, २४ नोव्हेंबर, २०२४

होती सोबत तुझीच आजवर 
जरी होत्या दोघांच्या वाटा वेगळ्या 
माहीत होते हातात राहणार नाही
तरी वेचल्या मी त्या लाटा सगळ्या 

कहाणी होती खरी वेगळीच काही 
तरी रचल्या साऱ्या कथा वेगळ्या
पाण्यावरतीच तरल्या डोही
जरी बुडवल्या गाथा सगळ्या 


सोमवार, १८ नोव्हेंबर, २०२४

दुरवर काळोख सारा, वाराही शांत आहे 

तिच्या शिवाय आज, खरच मी  जिवंत आहे ?


बुधवार, १६ ऑक्टोबर, २०२४

खुप दिवसांनी आज तीचा

मेसेज आला कसा आहे...

आग वेडे बदलली तर तू

मी जसा होतो तसा आहे...

 Sandip S. Jagtap

मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०२४

पांघरले आभाळ प्रेमाचे जरी

पाय माञ शेवटी उघडेच होते 

तिच्या साठी जोडले हात जेथेही

ते सारे रंगलेले दगडेच होते


पाहीली वाट आयुष्यभर तीची

मेलो तरी डोळे ऊघडेच होते

तीही रडालीच मेल्यावर मी

रडणारे आता सगळेच होते

 

Sandip s. jagtap

सोमवार, १४ ऑक्टोबर, २०२४

करणार होतो कॉल तुला पण

तु पहिल्या सारखी राहीली नाही

कालच काढली होती आठवण

ती अजुनही तु पाहिली नाही


Sandip s. jagtap






  ,  

मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०२४

जर आलीच आठवण कधी
तर नीरोप दे त्या वाऱ्याकडे
मी पाहतच आसेल तिकडे
तुही पाहा त्याच ताऱ्याकडे

sandip s. jagtap

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०२४

स्वप्नच होत ते

स्वप्नच होत ते,

स्वप्नच होत ते, मला खरे वाटत होते,
पण वास्तवा पेक्षा तेच बरे वाटत होते

भांडण्यातही होत प्रेमच तीच्या
आन मला ते वादळ वारे वाटत होते

काजव्यांचा घोंगाट होता भोवताली
काळोखात मला ते तारे वाटत होते

खरा गोडवा तीच्या  बोलण्यात होता
 मला ते नेहमीच  खारे वाटत होते

स्वप्नच होत ते, मला खरे वाटत होते,
पण वास्तवा पेक्षा तेच बरे वाटत होते

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०२४

फक्त रड म्हणा

फक्त रड म्हणा


(फक्त लढ म्हणा या कवी कुसुमाग्रज यांच्या कवीतेचे वीडंबन)

ओळखलत का डाॅक्टर
दवखाण्यात आला कोणी,
कपडे होते  फाटलेले 
डोळ्यांमध्ये  पाणी ॥

क्षणभर  हसला गपकण बसला
बोलला दम खाऊन ,
लव लेटर द्यायला  गेलो 
तीने दिल्या  दोन  ठेवून॥ 

दोन  मिनिटात  तेथे
भाव तीचा पोहचला,
चपल्या टाकून  पळालो
जिव कसाबसा  वाचला ॥

हात मोडला , पाय मोडला 
कंबरटेच पार मोडले,
प्रसाद  म्हणून  घरी  येऊन 
बापानी तीच्या  झोडले॥ 

इंजेक्शन  कडे  हात जाताच
कसाबसा  उठला ,
इंजक्शन नको डाॅक्टर 
फक्त मुक्का मार बसला ॥

राहीलेले लव लेटर 
आता  लीहीत आहे,
मुक्का मार त्याची
आठवण देत  आहे॥

खाल्ला  एवढा  मार तरी 
मोडला नाही  कणा, 
पाठीवरती हात ठेवून
फक्त रड म्हणा॥

sandip jagtap

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०२४

चार आणे

चार आणे

खुप दिवसानंतर काल 
भेटले होते चार आणे
किंमतच राहीली नाही
सांगु लागले गाऱ्हाणे

दोन हाजाराची नोट मग
बोलली तोऱ्या तोऱ्याने
आम्हालाही याव लागत होत
नेहमी मागच्या दाराणे

हाजार पाचशेही बंद झाले
नोट बंदिच्या काहाराणे
शंभर दोनशे थकुन गेले
आर्थकारणाच्या भाराणे

कोण मोठा कोण लहान
सगळ्यांचेच आहेत हाल
चार आण्याला भेटल्यावर
सारे लक्षात आले काल

sandip s. jagtap

my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com

सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४

ओझे

ओझे
दगडाचे गाठोडे डोक्यावरती घेऊन
त्या उंच डोंगरावरती जात आहे।।
पण प्रश्न कधीच का पडत नाही
हे ओझे मी का वाहत आहे।।

काट्याकुट्यातून वाट काढत
प्रवास अखंड करतो आहे।।
भेटतील जे ही दगड वाटेत 
गाठोड्यात भरतो आहे।।

डोक्यावरचे ओझे कधी
खांद्यावरती घेत आहे।। 
खांद्यावरचे ओझे पुन्हा
डोक्यावरतीच जात आहे।।

पण प्रश्न कधीच का पडत नाही
हे ओझे मी का वाहत आहे।।

मदतीला भेटेल कोणी 
वाट त्याची पाहत आहे।।
भेटला जो ही वाटेवरती
स्वतःचेच ओझे  वाहत आहे।।

थांबलो जरी विसाव्याला
गाठोडे उशाला घेत आहे।। 
रात्रंदिवस त्याला
उभा पहारा देत आहे।।

पण प्रश्न कधीच का पडत नाही
हे ओझे मी का वाहत आहे।।

निम्म्या प्रवासानंतर मग 
गाठोड्याचे  ओझे वाटू लागते।।
जसा प्रवास पुढे जाईल
गाठोडेही फाटु लागते।।

घेऊन जावे का ठेऊन जावे
प्रश्न पुढे येत आहे।।
घेऊन कोणीच जात नाही
येथे दगडच शिल्लक राहत आहे।।

त्या दगडांचे मग पुन्हा
उंच डोंगर होत आहे।।
पण प्रश्न कधीच का पडत नाही
हे ओझे मी का वाहत आहे।।

sandip s. jagtap


my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com

मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४

नको कांगावा पाणी ओतायचा
झोपडी केव्हाची पेटुन गेली
आता लावतेस मलम कशाला
जखम काळजाला आतुन झाली

करू नकोस आरोप कोणावर
चुक तर माझ्याच हातून झाली
मी विश्वास ठेवला त्या पहाटेवर
जी आंधाराला रात्रीच भेटुन गेली

..... sandip s. jagtap



सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४

गेली आहेस तु, जेव्हा रूसून माझ्यावर
गझलही रुसली, तेव्हा पासुन माझ्यावर

sandip s. jagtap

सोमवार, १६ सप्टेंबर, २०२४


तीला वाटले, आज कविता केली नाही
म्हणजे तीची आठवणच आली नाही
कसे सांगु तुला आजुन तु
डोळ्यासमोरूनच गेली नाही

शनिवार, १४ सप्टेंबर, २०२४

कविता माझ्या तिला खोट्या वाटतात
कविता माझ्या तिला छोट्या वाटतात
म्हणून पाहिला संग्रह जुनाच ऊचकुन
कविता मला माझ्या एकट्या वाटतात

...... sandip s. jagtap

शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०२४

नको तुझा होकार आता

नको तुझा होकार आता

नको तुझा मला नकार आता
नको तुझा मला होकार आता
झाले गेले सारे विसरून जा
नको चर्चा सारी मोकार आता

होती गरज कधी माझीही तुला
झालो आहे बघ बेकार आता
साथ सोडली वेळेनेही जेव्हा
शिकारीच झाला शिकार आता

...... sandip s. jagtap

रविवार, १८ ऑगस्ट, २०२४

जर तुला जमल तर

 जर तुला जमल तर

बघ करून एवढच फक्त , जर तुला जमल तर
दे घोटभर पाणी, कोण चालुन चालून दमल तर

हासत आहे जसा तु, तसा दुसऱ्यांना ही हासवत राहा
काय माहीत हासता हासताच जर आयुष्य थांबल तर

बघ करून एवढच फक्त , जर तुला जमल तर

उंच उंच बिल्डींग आणी खोट्या  खोट्या चेहऱ्यांतुन
गावाकडेही जाऊन बघ, माणसात मन रमल तर

घे भरारी ऊंच आकाशात, जिंकुन घे हे सारे जग
पाय मात्र जमीनीवरच ठेव, बघ तुला जमल तर

...... sandip s. jagtap

शनिवार, १० ऑगस्ट, २०२४

ती सोडुन गेल्याचे, नका विचारू मला आता

ती सोडुन गेल्याचे, नका विचारू मला आता

ती सोडुन गेल्याचे, नका विचारू मला आता
खुप कष्टाने आज, विसरलो मी तीला आता

माझ्यापाशी तीचे आता काहीच ऊरले नाही
शब्दही खोटाच निघाला, जो तीने दिला होता

तिच्या पाशीही आसेल काही, आसे वाटत नाही 
आसा कोणता व्यवहार आमच्यात झाला होता

खापर चर्चानचे तीने फोडले, माझ्यावरच सारे
खरा बोभाट तर, तीच्या मैत्रीणीनेच केला होता

ती सोडुन गेल्याचे, नका विचारू मला आता
खुप कष्टाने आज, विसरलो मी तीला आता

...... sandip s. jagtap

गुरुवार, २५ जुलै, २०२४

खुप दिवसांनी आज कविता लिहायला घेतली
कारण तेच होते, आज ती पुन्हा एकदा भेटली
 
बोलायचे होते खुप काही, ते आजही राहुन गेले
राहीले होते तेव्हाही, जेव्हा ती पहील्यांदा भेटली

---  Sandip s. Jagtap
my blog-
http://sandipsjagtap.blogspot.com






सोमवार, २४ जून, २०२४

मला नेहमी आसे का टाळतेस

मला नेहमी आसे का टाळतेस

मला नेहमी आसे का टाळतेस
काळीज माझ का जाळतेस

नसेल प्रेम तुझे सांगुन टाकावे
उगच माझ्यावर का भाळतेस

माहीत आहे तुला आवडतो मोगरा
डोक्यात चाफा मग का माळतेस

मला नेहमी आसे का टाळतेस
काळीज माझ का जाळतेस

ह्रदयात तुझा मिच आहे आजही
मोकार पसारा मग का चाळतेस

आहेत जर आपल्या वाटाच वेगळ्या
आभाळाला क्षीतीजावर का मिळतेस

मला नेहमी आसे का टाळतेस
काळीज माझ का जाळतेस

sandip s. jagtap

बुधवार, १९ जून, २०२४

कळिणेही फुलुन घ्यावे, गळुन जाण्याआधी
रोपानेही बहरुन घ्यावे, जळुन जाण्याआधी

समुद्राला मिळाल्यावरती आस्तीत्व तरी काय तीचे
नदिनेही खळखळुन घ्यावे मिळुन जाण्याआधी







शुक्रवार, ३१ मे, २०२४

बिना नावाची नाती

बिना नावाचीच बघ
आसतात  काही नाती
ज्याच्या साठी आजवर
किती जागल्या मी राती

नाही काहीच जवळ
तरी हारवण्याची भीती
सांग फुलाचा सुगंध
त्याला जपावा तरी किती

सांग आभाळाला तुझ्या 
मला बरी आहे माती
होते ढगांचेही पाणी
फक्त तीच्या भेटी साठी

बिना नावाचीच बघ
आसतात काही नाती

sandip s. jagtap

शुक्रवार, २४ मे, २०२४

राखण करतो ज्याची
ते गबाळ माझे नाही
अन जेथे चंद्र माझा
ते आभाळ माझे नाही

sandip s. jagtap

मंगळवार, ७ मे, २०२४

आज शब्दही धोका देऊन गेले


आज शब्दही धोका देऊन गेले

माणसानचे ठीक आहे हो,
आज शब्दही धोका देऊन गेले
तुटके शेर माझ्या साठी आन
मतला माझा घेऊन गेले

वाटले होते गझल माझी
पुर्ण होईन तुझ्या साथीने
जरी दुख: गेले ठेऊन मला
रदीफ, काफिया घेऊन गेले

माणसानचे ठीक आहे हो,
आज शब्दही धोका देऊन गेले

---  Sandip s. Jagtap
my blog-
http://sandipsjagtap.blogspot.com


शनिवार, ४ मे, २०२४

जाता जाता

जाता जाता तुला आज
मनभरुन पाहुन घेतो
तुझ्या शिवाय राहण्याची
सवय मनाला लावुन घेतो

तुझ्या बरोबर कँफी पिण्याचे
स्वप्न स्वप्नच राहुन देतो
तू तूझी कँफी पिऊन घे
मिही माझी पिऊन घेतो 

जाता जाता तुला आज
मनभरुन पाहुन घेतो

---  Sandip s. Jagtap
my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com




शुक्रवार, ३ मे, २०२४

परक्यानपासुन थोडे दुरूनच राहावे
स्वत:  पुरते थोडे ऊरुनच राहावे

कापुर होण्यापेक्षा ऊदबत्तीच बरे
राखेपुरते तरी पुरूनच राहावे

---  Sandip s. Jagtap
my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com

बुधवार, १ मे, २०२४

मला न सांगताच

मला न सांगताच

मला न सांगताच तु,
जेव्हा निघुन जाते बघ
भकास होते सारी दुनीया,
भकास सारे होते जग

विसरुन जाते जरी मन,
आठवण येते तरी पण
खोटे खोटे हासता हासता
डोळ्यात पाणी येते बघ

मला न सांगताच तु,
जेव्हा निघुन जाते बघ

---  Sandip s. Jagtap
my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com

बुधवार, २४ एप्रिल, २०२४

आसे थोडे सखे तुझे गाल आहे

आसे थोडे सखे तुझे गाल आहे

रात्रभर जागावे विचारात तुझ्या
आसे थोडे आज माझे हाल आहे
लिहावी गझल रोज तुझ्यावरी
आसे थोडे सखे तुझे गाल आहे

तुझ्या नकट्या नाकावर 
 रोज लिहावे किती मी
हारणी सारखी थोडी
 तुझी चाल आहे

तुझ्या टपोरा  डोळ्यांवर 
कराव्या कविता हाजारो
आसे  कोठे  डोळे  
तुझे नशिले आहे

भरावे पोट पाहुन तुला
आसे ओठ थोडे तुझे लाल आहे
 फुल  चाफ्याचे डोक्यात माळावे तुझ्या
आसे थोडे सखे तुझे बाल आहे

---  Sandip s. Jagtap
my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com






तुझा होकार बास आहे

तुझा होकार बास आहे

कोण म्हणते जगण्यासाठी
आती आवश्यक श्वास आहे
जगण्यासाठी मला फक्त
तुझा होकार बास आहे

केलास तु , जो इशारा
काल जाता - जाता
हा तुझा होकार समजु
का माझा भास आहे 

कोण म्हणते जगण्यासाठी
आती आवश्यक श्वास आहे

नको टाळुस तु मला 
नजरे समोर आशी
तुझा शिवाय फुलालाही
पाकळ्यांचा त्रास आहे

कोण म्हणते जगण्यासाठी
आती आवश्यक श्वास आहे
जगण्यासाठी मला फक्त
तुझा होकार बास आहे

---  Sandip s. Jagtap
my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com




मंगळवार, १६ एप्रिल, २०२४

रेती

रेती

शोधत होतो या किनारी,
ती गावाकडची माती
कळलेच नाही कधी नीसटली
पायाखालची रेती 

रोज  नवीन लाठा येथे,
रोज नवीनच भेटी
लाठांमध्ये शोधत राहीलो
मी विश्वासाची नाती

---  Sandip s. Jagtap
my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com





रविवार, १४ एप्रिल, २०२४

काय सांगु तुझाविना
माझे काय हाल होते
तुझे जे आज आहेत
माझे ते काल होते

गरीबी फक्त मलाच येथे
बाकी सारे मालामाल होते
काय सांगु तुझाविना
माझे काय हाल होते

---  Sandip s. Jagtap
my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com

बुधवार, ३ एप्रिल, २०२४

मोकळे आभाळ बरे

मोकळे आभाळ बरे

नको सुर्य, नको चंद्र, 
नको लूकलुकणारे तारे
एकटा  जिव त्याला
मोकळे आभाळ बरे

 आन काय करणार त्या 
 वसंत ऋतुचे आता
मोकळेच माळराण आन
बरे आहे वादळ वारे

---  Sandip s. Jagtap

my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com

शनिवार, २३ मार्च, २०२४

कोणीच नाही ती माझी
तरीही माझी वाटते
प्रेम वगेरे काहीच नाही
फक्त काळजी वाटते

---  Sandip s. Jagtap

my blog-
  http://sandipsjagtap.blogspot.com

गुरुवार, २१ मार्च, २०२४

तुला पाहण्याचा आसा आजार झाला

तुला पाहण्याचा आसा आजार झाला

तुला पाहण्याचा, आसा आजार झाला
भेटी साठी जिव, जसा बेजार झाला

माझ्याकडे जेव्हा, पाहीला फोटो तुझा
तेव्हा पासुन दुश्मन, सारा शेजार झाला
तुला पाहण्याचा, आसा आजार झाला

तुला विसरण्याचे, केले उपाय किती 
भावनानचा येथे, सारा बाजार झाला
तुला पाहण्याचा, आसा आजार झाला

तुला पाहुनच आता, भरते पोट माझे
हा मोकारच कशाला, पाहुनचार केला
तुला पाहण्याचा, आसा आजार झाला

पाहतो सारखाच, तु तक्रार केली माझी
अन डोळा माझाच तूला, साक्षीदार झाला
तुला पाहण्याचा, आसा आजार झाला

तु एकट्याला सोडुन, गेलीस दुर जरी 
तुझ्या आठवणीने, मला आधार दिला

तुला पाहण्याचा, आसा आजार झाला
भेटी साठी जिव, जसा बेजार झाला

sandip s. jagtap
my blog:

शुक्रवार, १५ मार्च, २०२४

आसे वाटते कधी कधी

आसे वाटते कधी कधी

तिही पाहते चोरुन मला, 
आसे वाटते कधी कधी
नजरेत ठेवते धरुन मला, 
आसे वाटते कधी कधी

तोल सावरने तीलाही आहे
पहिल्या पेक्षा कठीण आता
पण तोल तीने का सावरावा
आसे वाटते कधी कधी

सोमवार, ११ मार्च, २०२४

वाटले कि लिहतो, मनाला पटले कि लिहतो
मनासारखे मन मनाला भेटले कि लिहतो



शुक्रवार, ८ मार्च, २०२४

बाई

बाई

एका जन्मी किती रुपे
बघा बदलते बाई
काल बापाची लाडकी 
आज कामाची तीला घाई

कधी गरीब गाई 
कधी आनाथांची माई
हारलेल्या भावासाठी 
आहे आधाराला ताई

एका जन्मी किती रुपे
बघा बदलते बाई

आपल्या लेकरा साठी
जरी हाळवी ती आई
गाडा मोडक्या संसाराचा 
हासत ढकलते बाई

एका जन्मी किती रुपे
बघा बदलते बाई

एका जन्मात ऊपकार
तीचे फिटणार नाही
तीच वीठ्ठल माझी
तीच माझी रूखमाई

एका जन्मात किती
रुपे बघा बदलते बाई




गुरुवार, ७ मार्च, २०२४

फक्त एक भेट मागतो

फक्त एक भेट मागतो

मि कधी ओठांवरती,
सखे तुझे ओठ मागतो
आठवणीत राहील आशी,
फक्त एक भेट मागतो
 
मी आणि तु  दोघेच
आसेल निवांत जेथे
विरहा नंतर भेटायला
आसे एक बेट मागतो

मि कधी ओठांवरती
सखे तुझे ओठ मागतो

बिज प्रेमाचे रूजेल जेथे, 
अश्रुंच्या ओलाव्यावरती
आसे उजाड माळरान
किंवा पडिक शेत मागतो

मि कधी ओठांवरती
सखे तुझे ओठ मागतो

तुझ्या प्रेमा पेक्षाही येथे 
आहे कोणती नशा गहरी
आठवणीत जगण्यासाठी
फक्त दोन घोट मागतो

मि कधी ओठांवरती,
सखे तुझे ओठ मागतो
आठवणीत राहील आशी,
फक्त एक भेट मागतो



बुधवार, २८ फेब्रुवारी, २०२४

पाठीवर केले, आज वार तीने

पाठीवर केले, आज वार तीने

ह्रदयात छेडली होती, तार जिने
पाठीवर केले, आज वार तीने

शस्त्रात कोणत्या ताकत होती
मग शब्दांनाच लावली धार तीने 

जखमाही मला समजल्या नाहीत
आसे घाव केले हळुवार तीने

जी फुले दिली मी, प्रेमाने तीला
माझ्यासाठी केले त्याचे हार तीने

दुःख ही मला हवेहवेसे वाटते
प्रेमात केले आसे बेजार तीने

गेलो घेऊन फुल गुलाबाचे तीला
हातात ठेवली होती तलवार तीने

ह्रदयात छेडली होती, तार जिने
पाठीवर केले, आज वार तीने





गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०२४

तीही बहुतेक माझ्या प्रेमात पडत आहे

तीही  बहुतेक माझ्या प्रेमात पडत आहे

वाटले होते आगदी तसेच घडत आहे
तीही  बहुतेक माझ्या प्रेमात पडत आहे

बोलणे माझ्याशी तिचे बिल्कुल होत नाही
एकांतात ती आता एकटी बडबडत आहे
तीही  बहुतेक माझ्या प्रेमात पडत आहे

चेहऱ्यावर आहे तिच्या वेगळी चमक आता
गालावर आता तिच्या खळी पडत आहे
तीही  बहुतेक माझ्या प्रेमात पडत आहे

पाहून आरशात एकटीच हासते ती
आठवणीत माझ्या एकटी रडत आहे
तीही  बहुतेक माझ्या प्रेमात पडत आहे

तिलाही भेटीची माझ्या ओढ आशी लागली
सागराला लाटा जशा किणाऱ्याशी ओढत आहे
तीही  बहुतेक माझ्या प्रेमात पडत आहे


शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

आसे काही नाही

आसे काही नाही

मिळाली सहज तर ठेवतो जवळ
भेटलीच पाहीजे आसे काही नाही

पाजली कोणी तर पितो बळच
घेतलीच पाहीजे आसे काही नाही

आहे तेवढ्यात मी आहे समाधानी 
बाटलीच पाहीजे आसे काही नाही

लागेल तशी मी हातानेच घेईल
ओतलीच पाहीजे आसे काही नाही

शेंगदाने फुटानेही चालतील मला
चकलीच पाहीजे आसे काही नाही

जास्तीची झाली तरीही सहन करतो
ओकलीच पाहीजे आसे काही नाही

गाडीही माझी आसते बेताची
ठोकलीच पाहीजे आसे काही नाही

न घाबरताही मी घरामध्ये जातो
ती झोपलीच पाहीजे आसे काही नाही

न बोलताच काही गप झोपुनही घेतो
ती भांडलीच पाहीजे आसे काही नाही

sandip s. jagtap
 my

गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०२४

माझे जगणे

माझे जगणे

माझे जगणे मी,
तुझे आयुष्यात येण्यात पाहिले
आन तुझे सुख तू,
माझ्या निघून जाण्यात पाहिले

 शब्द जरी तुझे,
 काळीज चिरुन जात होते
 प्रत्येक शब्द तुझे,
 मी माझ्या गाण्यात पाहिले

तुझ्या टपोऱ्या डोळ्यांमध्ये
असा मी हरवून गेलो
तुझ्या खोट्या सौंदर्यापुढे
चंद्र सूर्य पाण्यात पाहिले

जरी हातात तुझ्या,
मी खंजिर देखले होते
तरी जगणे मी,
तुला मिठीत घेण्यात पाहिले

sandip s. jagtap
 my